या आठ कारणांमुळे गूगल कर्मचारी पार्किंग एरियामध्येच ठोकतात तळ!

काम करण्याचं सर्वोत्तम ठिकाण म्हणून गूगल गेल्या काही वर्षांपासून पहिल्या स्थानांवर राहिलंय. 'गूगल'मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जगातील सर्वात जास्त पगार मिळतो, असंही सांगितलं जातं. पण, असं असलं तरी गूगलचे काही कर्मचारी मात्र गूगलच्या पार्किंग एरियामध्ये राहतात. यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही... पण, हे खरं आहे. 

Updated: Jan 14, 2016, 01:05 PM IST
या आठ कारणांमुळे गूगल कर्मचारी पार्किंग एरियामध्येच ठोकतात तळ! title=

नवी दिल्ली : काम करण्याचं सर्वोत्तम ठिकाण म्हणून गूगल गेल्या काही वर्षांपासून पहिल्या स्थानांवर राहिलंय. 'गूगल'मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जगातील सर्वात जास्त पगार मिळतो, असंही सांगितलं जातं. पण, असं असलं तरी गूगलचे काही कर्मचारी मात्र गूगलच्या पार्किंग एरियामध्ये राहतात. यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही... पण, हे खरं आहे. 

गूगल कर्मचारी आपल्या कामाच्या ठिकाणीच जास्तीत जास्त वेळ व्यतीत करतात आणि रात्रीही पार्किंग एरियामध्येच राहतात, असं वारंवार समोर आलंय... यामागची कारणंही मजेशीर आहेत. 

 

१. 'गूगल'च्या कॅम्पसमध्ये राहणं जास्त फायदेशीर आहे.... आणि हे फारसं कठिणही नाही.

२. इथले कर्मचारी कॅम्पसमधल्या जीममध्ये आंघोळ करतात आणि आपल्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्येच जेवण करतात. गूगलमध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांना मोफत जेवण मिळतं. 

३. कर्मचारी आपले कपडे धुण्याचा कार्यक्रम कॅम्पसमध्येच उरकू शकतात. त्यामुळे तीही अडचण नाही. 

४. कर्मचाऱ्यांसाठी 'रेस्टरूम' उपलब्ध आहे. त्यामुळे, जेव्हा केव्हा त्यांना आराम करावासा वाटेल तेव्हा गूगलच्याच या रेस्टरूममध्ये ते आराम फर्मावू शकतात.

५. लंडनमध्ये ऑफिस असल्यामुळे कर्मचाऱ्यांना जर लवकर राहण्यासाठी घर मिळालं नाही तर ते पार्किंग एरियामध्येच राहतात. 

६. साऊथ बे परिसरात घरांच्या किंमती आणि भाडं जास्त असल्यामुळे हे थोडं महागडं ठरतं. त्यामुळे, कुटुंब सोबत नसलेले कर्मचारी हा पर्याय निवडतात.

७. गूगलच्या कॅम्पस परिसरात राहिल्यानं पैसे वाचवण्यासाठीही मदत होते. कमी वयात ही कंपनी जॉईन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही 'सेव्हिंग' फायदेशीर ठरते. 
 
८. काही कर्मचाऱ्यांनी आपणं पार्किंग लॉटमध्ये 'टेन्ट' टाकून राहिल्याचंही सांगितलंय. हा अनुभव त्यांच्यासाठी काहिसा 'कॅम्पिंग'प्रमाणे होता.