क्रेडिट कार्डमुळे होणारे हे ५ नुकसान बँक सांगत नाही...

नेहमी अंस पाहिलं जातं की, आपल्याला एखादी वस्तू आवडली तर ती लगेच विकत घेणं कधी कधी आपल्या बजेट बाहेर असू शकतं. अशावेळी आपल्या हाताशी क्रेडिट कार्ड असेल तर ती विकत घेतो आणि ग्रेस पिरेड आधीच रक्कम भरली तर व्याजाचं नुकसान होत नाही.

Updated: Sep 6, 2015, 01:53 PM IST
क्रेडिट कार्डमुळे होणारे हे ५ नुकसान बँक सांगत नाही... title=

मुंबई: नेहमी अंस पाहिलं जातं की, आपल्याला एखादी वस्तू आवडली तर ती लगेच विकत घेणं कधी कधी आपल्या बजेट बाहेर असू शकतं. अशावेळी आपल्या हाताशी क्रेडिट कार्ड असेल तर ती विकत घेतो आणि ग्रेस पिरेड आधीच रक्कम भरली तर व्याजाचं नुकसान होत नाही.

याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बँक खात्यातून लगेच पैसे कापल्या जात नाहीत. तर डेबिट कार्डमधून लगेच कापले जातात. मात्र क्रेडिट कार्ड वापरतांना आपल्याला काही बाबींकडे लक्ष द्यायला हवं, नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं. 

आणखी वाचा - गुंतवणुकीची पहिली पायरी 'बचत', जाणून घ्या बचतीच्या 5 टिप्स

१. आपल्या बँक अकाऊंटमधील बॅलेंस मिनिमम बँलेसच्या खाली आलं की, लगेच आपल्याला मॅसेज येतो. मात्र क्रेडिट कार्डचं बिल जमा करा, असा काही मॅसेज मोबाईलवर येत नाही. कपंनीला आपण पैसे भरायला जितका उशीर लावाल तितकं चांगलं असतं, कारण तुम्ही जितका उशीर लावाल तितकी जास्त लेट फी भरावी लागेल.

२. ग्राहकांना नेहमी फ्री इएमआय क्रेडिट कार्डवर झिरो परसेंटवर इएमआयचं आश्वासन मिळतं. मात्र आपल्याला आश्चर्य वाटेल की शून्य टक्के व्याजावर इएमआयवर नियम आणि अटी लागू असतात. जर आपण एकाही अटीचं उल्लंघन केलं तर ५-१० नाही तर २० टक्क्यांहून अधिक व्याज फेडावं लागतं.

३. बँक आपल्याला कधीही स्वत:हून सांगत नाही की आपण आपले पॉईंट्स कसे रिडिम करू शकता. अशात माहिती नसेल तर लाखोंचे पॉईट्स पडलेले राहतात आणि क्रेडिट कार्ड एक्सपायर होऊन जातं. याशिवाय जेव्हा आपले पॉईंट्स १००० ते १०००० सारखा लँडमार्क क्रॉस करतात. तेव्हा बँक ते आपल्याला सांगत नाही की आपले इतके पॉईंट्स झालेत आणि आपण ते रिडिम करून कॅशबॅकचा फायदा घेऊ शकता.

४.  बँक नेहमी आपल्याला ऑफर देते की, आपण फ्री ऑफ कॉस्ट आपलं सिल्वर कार्ड गोल्डमध्ये आणि गोल्ड कार्ड प्लॅटिनममध्ये अपग्रेड करू शकता. पण हे सांगत नाही की, या नवीन क्रेडिट कार्डसाठी आपल्याला ५०० पासून ७०० रुपयांपर्यंत फी भरावी लागेल.

५. क्रेडिट कार्ड ग्राहकाला नेहमी एक कॉल येतो, आपल्या क्रेडिट कार्डची लिमिट मोफत वाढण्यात येतेय. मात्र बँक हे सांगत नाही की, यासोबतच तुमचं वार्षिक शुल्क वाढतं.  

 

आणखी वाचा -  नोकरी : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.