ब्रेकअप झाल्यानंतर एक्सबॉयफ्रेंडबद्दल असा विचार करतात मुली

पहिले प्रेम विसरणे कधीच शक्य नसते. पहिले प्रेम सक्सेस झाले अथवा नाही झाले तरीही त्याच्या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतात. अनेक लोकांना पहिल्या प्रेमात यश मिळत नाही मात्र तरीही आयुष्य हे सुरुच राहते. 

Updated: Sep 4, 2016, 02:06 PM IST
ब्रेकअप झाल्यानंतर एक्सबॉयफ्रेंडबद्दल असा विचार करतात मुली title=

मुंबई : पहिले प्रेम विसरणे कधीच शक्य नसते. पहिले प्रेम सक्सेस झाले अथवा नाही झाले तरीही त्याच्या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतात. अनेक लोकांना पहिल्या प्रेमात यश मिळत नाही मात्र तरीही आयुष्य हे सुरुच राहते. 

रिलेशशिपमधून बाहेर पडले तरीही आपल्या एक्स पार्टनरबाबत जाणून घेण्याची इच्छा असतेच. त्यामुळेच ब्रेकअपनंतरही एक्स पार्टनर काय करतो हे जाणून घेण्यासाठी त्याचे अथवा तिचे फेसबुक पेज चेक करणे सुरुच असते. 

ब्रेकअप झाल्यानंतर एक्सबॉयफ्रेंडबद्दल असा विचार करतात मुली

1. मी एक्स बॉयफ्रेंडचे फेसबुक पेज चेक केले हे त्याला कळणार तर नाही ना?
2. अरे माझी रुममेट तर त्याच्या मित्राची बहिण आहे. आता काय होईल?
3. त्याने असे स्टेटस माझ्यासाठीच ठेवले असेल. याच तारखेच्या आसपास आमचा ब्रेकअप झाला होता. 
4. अरे त्याच्याजवळ उभी असलेली मुलगी आहे तरी कोण?
5. एक्स बॉयफ्रेंडला चिकटून उभ्या असलेल्या मुलीचे प्रोफाईल चेक करु का?
6. अरे याने आपली दाढी का वाढवलीये? कसा दिसतोय तो?