डेटिंग साइट हॅक, ३.७ कोटी यूझर्सचे नाव-फोटो उघड

'लाइफ इज शॉर्ट, हॅव अॅन अफेअर' अशी टॅगलाईन असलेली अमेरिकेतील ऑनलाइन डेटिंग साइच 'अॅशले मेडिसन डॉट कॉम' हॅक झालीय. या वेबसाईटवर लग्न झालेले लोकं डेटिंग करण्यासाठी पार्टनर निवडतात. ज्यांना लग्नासोबतच अफेअर करायचं असतं.

Updated: Jul 21, 2015, 04:23 PM IST
डेटिंग साइट हॅक, ३.७ कोटी यूझर्सचे नाव-फोटो उघड  title=

नवी दिल्ली: 'लाइफ इज शॉर्ट, हॅव अॅन अफेअर' अशी टॅगलाईन असलेली अमेरिकेतील ऑनलाइन डेटिंग साइच 'अॅशले मेडिसन डॉट कॉम' हॅक झालीय. या वेबसाईटवर लग्न झालेले लोकं डेटिंग करण्यासाठी पार्टनर निवडतात. ज्यांना लग्नासोबतच अफेअर करायचं असतं.

ही वेबसाइट हॅक झाल्यामुळं आता लपून-चोरून या साइटवर अफेअर करणाऱ्यांची माहिती उघड झालीय. नवा, पत्ता आणि फोटो असलेली ही माहिती हॅक झालीय. त्यामुळं जवळपास ३.७ कोटी युजर्सची वैयक्तिक माहिती उघड झालीय.

काही जणांनी आपलं अकाऊंट खोट्या नावानं बनवलं होतं. मात्र मेल आयडी आणि फोन नंबर हॅक झाल्यानं त्यांच्या परिचयाच्या लोकांना ही माहिती मिळू शकेल की, कोण या डेटिंग वेबसाइटवर लॉग इन करतं. त्यामुळं आता अशा साइटवर डेटिंग करणाऱ्यांवर संकट आलंय. 

लोकांनी रजिस्टर करण्यासाठी या साइटवर आपली आवड, पार्टनरचं वय, रंग, साइज सारख्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.