एअरटेलची जबरदस्त ऑफर, 51 रुपयांमध्ये वर्षभरासाठी 3G/4G इंटरनेट

रिलायन्स जिओला धक्का देण्यासाठी एअरटेलनं इंटरनेट डेटा प्लॅनची जबरदस्त ऑफर आणली आहे.

Updated: Aug 29, 2016, 04:12 PM IST
एअरटेलची जबरदस्त ऑफर, 51 रुपयांमध्ये वर्षभरासाठी 3G/4G इंटरनेट  title=

मुंबई : रिलायन्स जिओला धक्का देण्यासाठी एअरटेलनं इंटरनेट डेटा प्लॅनची जबरदस्त ऑफर आणली आहे. भारती एअरटेलनं त्यांच्या 4G आणि 3G इंटरनेट डेटा प्लॅनच्या दरांमध्ये 80 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना वर्षभरासाठी 51 रुपयांमध्ये 1 GB इंटरनेट मिळणार आहे. 

या स्कीमसाठी एअरटेलच्या ग्राहकांना पहिले 1,498 रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे. हे रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना 28 दिवसांसाठी 1GB 3G/4G इंटरनेट डेटा मिळणार आहे. 

हे 28 दिवस किंवा 1GB इंटरनेट वापरल्यानंतर एअरटेलच्या ग्राहकांना 51 रुपयांमध्ये 3G/4G इंटरनेट डेटा मिळणार आहे. मुख्य म्हणजे याची व्हॅलिडिटी 12 महिने असणार आहे. 1GB डेटा संपला तरी तुम्ही कितीही वेळा 51 रुपयांचं रिफील करू शकता. 

31 ऑगस्ट 2016 पासून एअरटेलची ही नवी ऑफर लॉन्च होणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.