सावधान! आपला पॅटर्न लॉक सेफ नाही

जर आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये पॅटर्न लॉक ठेवता आणि विचार करताय की स्मार्टफोन सुरक्षित आहे तर आपण नाराज होवू शकता. स्मार्टफोन पॅटर्न लॉकबाबत केल्या गेलेल्या अभ्यासानंतर धक्कादायक खुलासा पुढे आलाय. नॉर्वेयन यूनिव्हर्सिटी ऑफ सायंस अँड टेक्नॉलीजीच्या रिसर्चनुसार साधारणपणे वापरल्या जाणाऱ्या पॅटर्न लॉक बाबत लवकर अंदाज येऊ शकतो.

Updated: Aug 25, 2015, 06:55 PM IST
सावधान! आपला पॅटर्न लॉक सेफ नाही  title=

मुंबई: जर आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये पॅटर्न लॉक ठेवता आणि विचार करताय की स्मार्टफोन सुरक्षित आहे तर आपण नाराज होवू शकता. स्मार्टफोन पॅटर्न लॉकबाबत केल्या गेलेल्या अभ्यासानंतर धक्कादायक खुलासा पुढे आलाय. नॉर्वेयन यूनिव्हर्सिटी ऑफ सायंस अँड टेक्नॉलीजीच्या रिसर्चनुसार साधारणपणे वापरल्या जाणाऱ्या पॅटर्न लॉक बाबत लवकर अंदाज येऊ शकतो.

अँड्रॉईड पॅटर्न लॉक एक सुरक्षित लॉक सिस्टिम आहे. मात्र आपण त्याचा वापर कशापद्धतीनं करतो हे त्यावर अवलंबून आहे. अँड्रॉईड पॅटर्न लॉक सिस्टिममध्ये कमीतकमी चार नोड आणि जास्तीतजास्त नऊ नोड्स असतात. एका रिसर्चमध्ये पॅटर्न लॉकचे तब्बल ४ लाख कॉम्बिनेशन दिले होते. मात्र अनेक यूजर्सनी एकसारखे पॅटर्न लॉक ठेवले.

४००० वेगवेगळ्या पॅटर्न लॉक सॅम्पलमधील ४४ टक्के यूजर्सनी आपला पॅटर्न लॉक स्क्रीन डाव्याबाजूनं वरच्या बाजूला सुरू करतात. तर ७७ टक्के यूजर्स पॅटर्न लॉकमध्ये इंग्रजीत N,O आणि M सारखे शब्द बनवतात. यासोबत रिसर्चमध्ये आढळलं की, मोठ्या संख्येत यूजर्स डाव्याबाजूनं उजवीकडे आणि वरून-खाली असे पॅटर्न असतात. याशिवाय जास्तीतजास्त यूजर पॅटर्न लॉकसाठी चार नोडचा वापर करतात.

आपलं पॅटर्न लॉक सुरक्षित करण्यासाठी काय करावं-

- सगळ्यात आधी आपल्या सिक्युरिटी सेटिंग्जमध्ये जावून 'मेक पॅटर्न लॉक विज्युअल' ऑप्शन बंद करा
- चार पेक्षा जास्त नोड्सचा वापर करा
- पॅटर्न लॉक कॉर्नरपासून सुरू करण्यापेक्षा मधून करा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.