TIPS: फ्री Wi-fi वापरा, पण सांभाळून

स्मार्टफोन असो, टॅबलेट किंवा लॅपटॉप.. इंटरनेटच्या वापराशिवाय हे तिन्ही वापरण्याचा काही उपयोग नाही. हेच कारण आहे की मोबाईल प्लानमध्ये डेटा कार्डनं लोकं २४ तास इंटरनेटसोबत जोडलेले असतात. यात आणखी एक नाव आहे ते Wi-fiचं... 

Updated: Nov 26, 2014, 05:49 PM IST
TIPS: फ्री Wi-fi वापरा, पण सांभाळून   title=

मुंबई: स्मार्टफोन असो, टॅबलेट किंवा लॅपटॉप.. इंटरनेटच्या वापराशिवाय हे तिन्ही वापरण्याचा काही उपयोग नाही. हेच कारण आहे की मोबाईल प्लानमध्ये डेटा कार्डनं लोकं २४ तास इंटरनेटसोबत जोडलेले असतात. यात आणखी एक नाव आहे ते Wi-fiचं... 

गरज आणि मागणी बघता आता अनेक शॉपिंग मॉल, हॉटेल आणि तसंच टुरिस्ट प्लेसेस वर पण फ्री Wi-fiची सुविधा देत आहेत. मात्र मोफत कनेक्शन वापरतांना जरा सावध राहा. कारण हॅकिंग करणाऱ्यांनाही आपली नवी शिकार मिळालीय. पण थोडी सावधगिरी बाळगल्यास यापासून बचाव करता येतो. 

जर आपण रस्त्यानं चालतांना, उठता-बसता मोफत Wi-Fiचा वापर करत असाल तर जरा सांभाळा. हे नाही की तुमचा डेटा चोरीला जाईल पण नेहमीसाठी तुमचा फोन, टॅबलेट आणि लॅपटॉपला नुकसान पण पोहोचू शकतं. यापासून वाचणं काही कठीण नाहीय, काही उपाय केले की हॅकर्स आणि घरफोडी करणाऱ्या नेटवर्कपासून तुम्ही वाचू शकता.
 
शेअरिंग बंद करा - 

पब्लिक Wi-Fi कनेक्शन वापरत असतांना शेअरिंग बंद करून द्या. जर आपण विंडोजचा वापर करत असाल तर कंट्रोल पॅनलमध्ये नेटवर्क अँड शेअरिंग सेंटरच्या आत ऍडव्हान्स शेअरिंग सेटिंगमध्ये जावून पब्लिक हेडिंगच्याखाली शेअरिंग ऑफ करू शकता. 

तर दुसरीकडे जर आपण MAC चा वापर करत असला तर सिस्टम प्रिफ्रेंसमध्ये जावून शेअरिंग आयकॉनवर जा आणि चेकबॉक्सला अनमार्क करा.  

अँड्रॉइड डिव्हाइसचा वापर करत असाल तर Wi-Fi कनेक्शन सेटिंगमध्ये जावून शेअरिंग ऑफ करता येवू शकतो. 

कोणतं नेटवर्क बरोबर आहे याची खात्री करा - 

साधारणपणे पब्लिक प्लेसवर अनेक फ्री Wi-Fi कनेक्शन दिसू शकतात. मात्र माहिती नसतांना कोणत्याही वायफायशी जोडू नका. त्यासाठी सर्वात आधी गरज आहे ती आपण जिथं आहात तिथं कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला ऑफिशिअल नेटवर्कचं नाव विचारावं. म्हणजे मॉल किंवा दुकानदारात त्यांच्या wi-fi होस्टचं नाव विचारून घ्या.

VPNचा वापर करा -

व्हीपीएन म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर पण आपल्या Wi-Fi कनेक्शनला सिक्युअर करू शकतो. 

HTTPS तपासूनच पुढं जा –

ही जुनी पद्धत आहे मात्र तरीही उपयुक्त आहे. जर आपण डिव्हाइसमध्ये क्रोम, ऑपेरा किंवा फायरफॉक्स ब्राऊजरचा वापर करत असाल तर आपल्याला माहितीय कोणतीही साइट ओपन केल्यावर त्याचा वेब एड्रेसच्या आधी HTTPS असतं. ब्राउजरच्या बाबतीत ही सेफ साइट असते. 

अपडेट करा पण लक्ष देऊन – 

सुरक्षित वायफाय कनेक्शनसाठी आपली ऑपरेटिंग सिस्टम आणि ऍप्सला अपडेट ठेवा. पण अपडेट करतांना फोन, टॅबलेट आणि लॅपटॉपला नेहमी अशाच कनेक्शनवर ठेवा जे आपल्याला माहितीय आणि सुरक्षित आहे.  

एक सारखा पासवर्ड ठेवू नये- 

अनेक वेळा पाहिलं जातं की लोकं सोशल नेटवर्किंगपासून मेल आयडीपर्यंत सर्व अकाऊंट्सचा एकच पासवर्ड ठेवतात. हे चुकीचं आहे. वेगवेगळ्या पासवर्डचा वापर करा. कारण अनेकदा लोक WiFiचा वापर करण्यासाठी अकाऊंट बनवतांनापण ते त्याच खास पासवर्डचा वापर करतात. त्यामुळं हॅकर्सचं काम सोपं होतं.  

नेटवर्क सोडण्यापूर्वी चेक करा - 

एकदा WiFi कनेक्शनशी जोडल्यानंतर आणि काम संपल्यानंतर कनेक्शन बंद करण्यापूर्वी आपण ते सर्व अकाऊंट आणि अॅप बंद करा, लॉगऑफ करा. ज्याचा वापर आपण नुकताच केलाय. सोबतच कनेक्शन सेटिंगमध्ये जाऊन कनेक्ट ऑटोमॅटिकली व्हेन अॅव्हेलेबलचं ऑप्शन अनचेक करा. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.