खुशखबर! देशभरात एअरटेलची 4G सेवा सुरू

भारती एअरटेलनं देशभरात आजपासून 4जी सेवा सुरू करण्याचं जाहीर केलंय. कंपनीनं सांगितलं की, देशातील 296 शहरांमध्ये पुढील काही आठवड्यातच ही सेवा सुरू होईल.

Updated: Aug 6, 2015, 02:25 PM IST
खुशखबर! देशभरात एअरटेलची 4G सेवा सुरू title=

नवी दिल्ली: भारती एअरटेलनं देशभरात आजपासून 4जी सेवा सुरू करण्याचं जाहीर केलंय. कंपनीनं सांगितलं की, देशातील 296 शहरांमध्ये पुढील काही आठवड्यातच ही सेवा सुरू होईल.

सुरूवातीला कंपनी 4जीच्या प्री-पेड ग्राहकांसाठी 255 रुपयांमध्ये 1जीबी, 455 रुपयांत 2 जीबी, 655रु. 3जीबी, 955रुपयांत 5 जीबी आणि 1505 रुपयांमध्ये 10 जीबी डेटा देणार आहे. 4जी फॅसिलिटी असलेला स्मार्टफोन, डोंगल, 4जी हॉटस्पॉट आणि वाय-फाय डोंगल्ससाठी मिळेल.

एअरटेलचे सीईओ गोपाल विठ्ठल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कंपनीनं सुरूवातीला सॅमसंगसोबत एक्स्क्लूझिव्ह अलायंस केली होती. मात्र आणखी काही मोबाईल कंपन्यांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे.' 

एअरटेलने 20 शहरांमध्ये 4जी सेवा सुरू केलीय. इतर शहरांमध्ये टेस्टिंग सुरू आहे. एअरटेलचे जवळपास 2 कोटी 3जी युजर्स आहेत. यातील अनेक कंपन्यांचे ग्राहक 4जी घेऊ इच्छित आहेत. 

रिलायन्स कधी आणणार 4जीच्या
मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम डिसेंबरपर्यंत देशात 4जी सेवा सुरू करू शकते. कंपनी नेटवर्क क्वालिटी टेस्ट करण्यासाठी बीटा प्रोग्राम सुरू करतेय. जूनमध्ये रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एप्रिल 2016 पर्यंत 10 लाख घरांमध्ये आमचं नेटवर्क असेल. तीन वर्षात रिलायन्स जिओ आपलं ऑप्टिकल फायबर नेटवर्क दुप्पट करेल, असं सांगितलं होतं. 

तसंच आयडिया, वोडाफोन आणि अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन या वर्ष अखेरीस किंवा पुढील वर्षी सुरूवातीला देशात 4जी सेवा सुरू करणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.