VIDEO : कारपेक्षाही जास्त वेगात पळणारा व्यक्ती पाहिलाय?

तुम्हाला फिरायला जायचंय पण तुमच्याकडे त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचण्यासाठी गाडी नाही... तरी काळजी करू नका... कारण, आता अशी पादत्राणं बनवण्यात आलीत ज्यांच्या साहाय्याने तुम्ही एखाद्या कारप्रमाणे वेगात धावू शकाल.

Updated: Apr 7, 2015, 11:40 AM IST
VIDEO : कारपेक्षाही जास्त वेगात पळणारा व्यक्ती पाहिलाय? title=

न्यूयॉर्क : तुम्हाला फिरायला जायचंय पण तुमच्याकडे त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचण्यासाठी गाडी नाही... तरी काळजी करू नका... कारण, आता अशी पादत्राणं बनवण्यात आलीत ज्यांच्या साहाय्याने तुम्ही एखाद्या कारप्रमाणे वेगात धावू शकाल.

होय, तज्ज्ञांनी असे 'बायोनिक शूज'चा अविष्कार सत्यात आणलाय. हे शूज परिधान करणारा व्यक्ती ४० किमी प्रति तासाच्या वेगानं धावू शकतो.

कीही सेयमोर या शोधकर्त्यांनं या शूजची निर्मिती केलीय. या शूजची किंमत १६,००० रुपयांच्या जवळपास आहे. सेयमोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शूजमध्ये एक स्प्रिंग लावण्यात आलंय, ज्याच्या साहाय्याने व्यक्ती कांगारूप्रमाणे लांब उड्या मारत धावू शकतो. 

या शूजच्या वापराच्या साहाय्यानं रस्त्यांवर गाड्यांमुळे होणारं ट्राफिक जॅम नक्कीच टाळता येऊ शकेल तसंच पर्यावरणाचा धोकाही कमी होईल. 

व्हिडिओ पाहा :-

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.