इडली, मेदूवडा सकाळी आणि सायंकाळी डोसा

असेच एक ठिकाण लालबागमध्ये आहे. अगदी सरदार हॉटेलजवळ, दिग्विजय मिलच्या कंपाऊंडला लागून.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 10, 2017, 11:39 AM IST

मुंबई : मुंबईत अनेक ठिकाणी डोसा, मेदू वडा, इडली मिळते, पण अशी काही ठिकाणं आहेत की तिथली चव सारखी जिभेवर रेंगाळत असते, तसेच खिशाला देखील परवडणारे हे पदार्थ असतात, असेच एक ठिकाण लालबागमध्ये आहे. अगदी सरदार हॉटेलजवळ, दिग्विजय मिलच्या कंपाऊंडला लागून.

 एक तरूण मुलगा आपल्या कामात सारखा व्यस्त असतो. ग्राहकांची पार्सल आणि डोसा देण्यात तो मग्न असतो. येथे सकाळचा नाश्ता मेदू वडा आणि इडली मिळते, सायंकाळी साध्या डोसा पासून म्हैसूर डोसा खाण्यासाठी रेलचेल असते. पार्सल घेऊन जाण्यासाठी देखील झुंबड उडते. पाहा नेमकं कुठे आणि कसा बनवला जातो येथे डोसा.