फ्रीडम २५१ नंतर आलाय फ्रीडम ६५१ पण...

मुंबई : फ्रीडम २५१ हा मोबाईल तुम्हाला इच्छा असूनही खरेदी करता आला नसेल तर मग आता तुमच्यासाठी ही संधी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा ! 

Updated: Feb 27, 2016, 05:00 PM IST
फ्रीडम २५१ नंतर आलाय फ्रीडम ६५१ पण... title=

मुंबई : फ्रीडम २५१ हा मोबाईल तुम्हाला इच्छा असूनही खरेदी करता आला नसेल तर मग आता तुमच्यासाठी ही संधी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा ! फ्रीडम ६५१ हा मोबाईल फोन प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. ही एक व्यंगपूर्ण वेबसाईट आहे ज्यात फ्रीडम २५१ ची टर उडवली आहे.

मंगळ ग्रहावर मिळतात मोबाईल फोन तयार करण्याचे भाग
या साईटनुसार त्यांचा फ्रीडम ६५१ हा फोन मंगळ ग्रहावर सापडणाऱ्या साहित्यापासून तयार करण्यात आला आहे. म्हणूनच तो इतक्या स्वस्त विकणे कंपनीला शक्य आहे.

फोन तयार करायला मंगळावर जावे लागेल
या वेब साईटच्या निर्मात्यांना आशा आहे की २०२५ पर्यंत माणूस मंगळावर पोहोचेल. त्यानंतर या फोनच्या निर्मितीला सुरुवात केली जाईल.

६५० रुपयांची गरज
या वेब साईटवर म्हटले आहे की मंगळावर जाण्यासाठी त्यांनी 'स्टँडर्ड फायरवर्क्स' या कंपनीशी करार केला आहे. या करारानुसार एका रॉकेटला बांधून ते लोकांना मंगळावर पाठवणार आहेत़. त्यासाठी त्यांना ६५० रुपयांची गरज आहे.