१ लीटरमध्ये २०० कि.मी धावणार सायकल

गुजरातमधील एका युवकाने एक अशी सायकल बनवलीये जी फक्त १ लीटरमध्ये २०० कि.मी. चालते. 

Updated: Jun 15, 2016, 08:02 PM IST
१ लीटरमध्ये २०० कि.मी धावणार सायकल  title=

नवी दिल्ली : गुजरातमधील एका युवकाने एक अशी सायकल बनवलीये जी फक्त १ लीटरमध्ये २०० कि.मी. चालते. पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमध्ये लोकांकरिता अशी सायकल एक वरदानच ठरणार आहे. अशी अनोखी सायकल बनवणारा या युवकाचे नाव राजकमल आहे.  

पेशाने ऑटोमोबाईल इंजिनियर असणाऱ्या राजकमलने ही सायकल अगदी कमी कालावधीत बनवून नवा विक्रमच केला आहे. या सायकलची डिझाईनदेखील इतर सायकलपेक्षा एकदम वेगळी आणि आकर्षित आहे. राजकमलच्या सांगण्यानुसार ही सायकल लवकरच मार्केटमध्ये येईल. 



 

 

किती किंमत असेल ?

सरकारच्या मान्यतेकरिता राजकमल ही सायकल आता नवी दिल्लीला पाठवणार आहे. सरकारच्या मान्यतेनंतर ही सायकल बाजारात उपलब्ध असेल. या सायकलची किंमत साधारण २०-२३ हजार इतकी असेल. 

ही आहेत सायकलची काही वैशिष्ट्ये 

१. ८० सीसी. दोन स्ट्रोक इंजिन

२. ४० ते ५० कि.मी प्रति तास वेग

३. पायडल मारल्यानंतर क्लच सोडल्यावर होते सुरू

४. २ लीटरची क्षमता असलेला फ्यूल टँक

५. पेट्रोल संपले तर पायडलने सुरू होते सायकल