११ इंचच्या या टॅबलेटवर विशेष ऑफर, केवळ ३९९ रुपयांत

एक ऑफर ११ इंचच्या टॅबलेटवर देण्यात आलेय. त्यामुळे हा नवा टॅबलेट ३९९ रुपयांमध्ये मिळणार आहे.

Updated: Mar 23, 2016, 07:07 PM IST
११ इंचच्या या टॅबलेटवर विशेष ऑफर, केवळ ३९९ रुपयांत title=

मुंबई : होळीचा माहोल जोरात आहे. अनेक कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर दिल्या जात आहेत. इलेक्ट्रॉनिक्स सामान आणि ऑनलाईन रिटेल कंपनी ही विशेष ऑफर देत आहेत. अशीच एक ऑफर ११ इंचच्या टॅबलेटवर देण्यात आलेय. त्यामुळे हा नवा टॅबलेट ३९९ रुपयांमध्ये मिळणार आहे.

मोबाईल फोन्स, टॅबलेटवर ऑफर देण्याचा सिलसिला सुरु आहे. अशी ऑफर किड्स जम्बो टॅबलेटवर देण्यात आलेय. हा टॅबलेट अॅपल आयपॅड प्रमाणे दिसतो. ११ इंच स्क्रीन असलेला हा टॅबलेटवर ६० टक्के डिस्काऊंट देण्यात आलेय. किड्स जम्बो टॅबलेटवर ही ऑफर ऑनलाईन शॉपिंग पोर्टल आस्कमीबाजार यावर देण्यात आली आहे. हा टॅबलेट मोबीक्विक वॉलेटवरुन खरेदी केली तर १० टक्के आणखी सूट मिळवू शकता

.

या टॅबलेटमध्ये ११ इंच डिस्प्ले स्क्रीन, वर्ड लर्निंग, लेटर लर्निंग, पियानो कीबोर्ड, एल्पाबेट साँग प्ले, वर्ड स्पेल फीचर्स देण्यात आले आहेत.