<b>नोकरीची संधी: कावेरी ग्रामीण बँकेत ७१६ जागा</b>

By Aparna Deshpande | Last Updated: Monday, December 16, 2013 - 16:25

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कावेरी ग्रामीण बँक ही एक प्रादेशिक ग्रामीण बँक आहे, २०१२मध्ये कर्नाटकातील तीन क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणानंतर ही बँक निर्माण झालीय. बँकेचं मुख्य कार्यालय म्हैसुरला असून कर्नाटक राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बँकेच्या शाखा आहेत.
कावेरी ग्रामीण बँकेनं नुकतीच्या विविध ग्रेड आणि पोस्टच्या ७१६ जागांची व्हॅकन्सी जाहीर केलीय. त्यात स्केल १, स्केल २ आणि स्केल ३च्या ऑफिसर आणि ऑफिस असिस्टंट या पोस्टचा समावेश आहेय त्यासाठी आयबीपीएस अंतर्गत घेतली जाणारी आरआरबी परीक्षेचं ऑक्टोबर २०१२ सालचं स्कोअर कार्ड आवश्यक आहे.
उमेदवारांनी आपला फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. त्याची अखेरची तारीख २६ डिसेंबर २०१३ आहे. अर्ज भरल्यानंतर त्याची रसीद घ्यायला विसरु नका.
२६ डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करु शकता. ११ डिसेंबरपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली असून २६ डिसेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करता येईल. तर अर्ज ऑनलाईन रिप्रिन्टची अखेरची तारीख ११ जानेवारी २०१४ आहे.
आयबीपीएस स्कोअर कार्ड
> ऑफिसर स्केल- ३ – १०३ आणि पेक्षा मार्क (एससी/एसटी) आणि १०९ पेक्षा अधिक मार्क्स अन्यसाठी आवश्यक
> ऑफिसर स्केल- २ (जीबीओ) – १०१ आणि पेक्षा मार्क (एससी/एसटी) आणि १०७ पेक्षा अधिक मार्क्स अन्यसाठी
आवश्यक
> ऑफिसर स्केल- २ (आयटी) – १०१ आणि पेक्षा मार्क (एससी/एसटी) आणि १०७ पेक्षा अधिक मार्क्स अन्यसाठी
आवश्यक
> ऑफिसर स्केल- २ (सीए) – १०१ आणि पेक्षा मार्क (एससी/एसटी) आणि १०८ पेक्षा अधिक मार्क्स अन्यसाठी
आवश्यक
> ऑफिसर स्केल- २ (लॉ, वकील) – १०७ आणि पेक्षा मार्क (एससी/एसटी) आणि ११४ पेक्षा अधिक मार्क्स अन्यसाठी
आवश्यक
> ऑफिसर स्केल- २ (कोषागार व्यवस्थापक) – १०३ आणि पेक्षा मार्क (एससी/एसटी) आणि १०९ पेक्षा अधिक मार्क्स अन्यसाठी
> ऑफिसर स्केल- १ – ९५ आणि पेक्षा मार्क (एससी/एसटी) आणि ९८ पेक्षा अधिक मार्क्स अन्यसाठी आवश्यक
> ऑफिस असिस्टंट पोस्टसाठी – ८८ मार्क पेक्षा अधिक (एससी/एसटी) आणि ९५ पेक्षा अधिक मार्क्स अन्यसाठी आवश्यक
निवड प्रक्रिया
> निवड प्रक्रिया ही आरआरबीच्या सामायिक लेखी परिक्षेच्या गुणसंख्येवर आधारीत आहे. त्यानंतर अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.
> ही मुलाखत म्हैसुर इथं घेण्यात येईल. पत्ता- CA-20, Vijayanagara, 2nd Stage, Mysore '€“ 570017.
> इतर महत्त्वाच्या माहितीसाठी बँकेकडून आलेलं नोटीफिकेशन पाहावं.
अर्ज करण्याची पद्धत
> इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कावेरी ग्रामीण बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जावून आयबीपीएस आरआरबीच्या परिक्षेचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून आपलं नाव नोंदवावं.
> त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरावा आणि त्याच्या पावतीचं प्रिन्ट पुढील उपयोगासाठी काढून ठेवावं.
> मुलाखतीला येतांना उमेदवारानं आपली सर्व मुळ कागदपत्र आणि सर्टिफिकेट्स सोबत आणावीत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 16, 2013 - 16:25
comments powered by Disqus