दिवाळी सेलदरम्यान लेईकोने बनवला रेकॉर्ड

चीनी उत्पादक कंपनी लेईकोने दिवाळी सेलदरम्यान जबरदस्त 350 कोटी रुपयांची विक्री करत नवा विक्रम रचलाय.कंपनीने शनिवारी याबाबतची माहिती दिली.

Updated: Nov 7, 2016, 11:15 AM IST
दिवाळी सेलदरम्यान लेईकोने बनवला रेकॉर्ड title=

नवी दिल्ली : चीनी उत्पादक कंपनी लेईकोने दिवाळी सेलदरम्यान जबरदस्त 350 कोटी रुपयांची विक्री करत नवा विक्रम रचलाय.कंपनीने शनिवारी याबाबतची माहिती दिली.

ऑक्टोबरमध्ये कंपनीने एकूण तीन लाख फोन आणि 3,500 टेलिव्हिजन विक्री केली. लेईको इंडियाचे स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स बिजनेस अधिकारी अतुल जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या दिवसांत ग्राहकांना अधिकाधिक चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न केला. तसेच ग्राहकांनी दिलेल्या प्रतिक्रियांनी आम्ही खुश आहोत. 

दिवाळीदरम्यान लेईको आपल्या अधिकृत वेबसाईट लेमॉलच्या व्यतिरिक्त अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलच्या माध्यमातूनही आपल्या उत्पादनांची विक्री केली.