आता मँगलोरमध्ये व्यापाऱ्याकडून कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट!

दिवाळीमध्ये सूरतच्या हिरे व्यापाऱ्यानं आपल्या कर्मचाऱ्यांना जबरदस्त बक्षिसं दिल्याचं आपल्याला माहितीय. त्याचधर्तीवर आता मँगलोरमध्ये एक व्यापारी वरदराज कमालक्ष नायक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट म्हणून दिल्या आहेत.

Updated: Mar 5, 2015, 06:21 PM IST
आता मँगलोरमध्ये व्यापाऱ्याकडून कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट! title=

मँगलोर: दिवाळीमध्ये सूरतच्या हिरे व्यापाऱ्यानं आपल्या कर्मचाऱ्यांना जबरदस्त बक्षिसं दिल्याचं आपल्याला माहितीय. त्याचधर्तीवर आता मँगलोरमध्ये एक व्यापारी वरदराज कमालक्ष नायक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट म्हणून दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या सीएनसी बॉल स्क्रूज अँड बिअरिंग कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर नायक यांनी आपल्या मँगलोरच्या कंपनीत आणि पुण्यातील ऑफिसमध्ये काम करणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून नॅनो कार दिलीय.

एका इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीनुसार नायक यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर २ कोटी रुपये आहे. या टर्नओव्हरचं संपूर्ण श्रेय नायक आपल्या कर्मचाऱ्यांना देतात. ते म्हणाले, 'मला माझं धन त्या लोकांसोबत वाटायचंय ज्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली आणि ज्यांच्यामुळे माझ्याजवळ इतका पैसा आला.'

नायक पुढे म्हणाले, 'हे लोक माझ्या फॅक्ट्रीचा आधार आहेत आणि तेच कंपनीचं नेतृत्व करतात.' त्यांनी सांगितलं की, मागील २५ वर्षांमध्ये त्यांना जो काही पूरस्कार मिळाला, तो त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाच्या भावनेनं काम केल्यामुळे. अशातच ते या गिफ्टचे हकदार आहेत. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.