टीव्ही स्क्रीनवर काळ्या पट्टीतल्या क्रमांकाचा अर्थ काय?

तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनसमोर बसला आहात... तुमच्या आवडीचा कार्यक्रम किंवा सिनेमा सुरू आहे... आणि अचानक टीव्हीच्या स्क्रीनवर एक काळी पट्टी येते... आणि तिच्यात काही नंबर दिसू लागतात...

Updated: Jun 23, 2016, 07:29 PM IST
टीव्ही स्क्रीनवर काळ्या पट्टीतल्या क्रमांकाचा अर्थ काय? title=

मुंबई : तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनसमोर बसला आहात... तुमच्या आवडीचा कार्यक्रम किंवा सिनेमा सुरू आहे... आणि अचानक टीव्हीच्या स्क्रीनवर एक काळी पट्टी येते... आणि तिच्यात काही नंबर दिसू लागतात...

का येते टीव्ही स्क्रीनवर ही पट्टी? या क्रमांकाचा अर्थ काय? याचा कधी विचार केलात...? नक्कीच हा प्रश्न कधी ना कधी तुम्हालाही पडला असेल... पण उत्तर मिळालं नसेल तर हा माहिती प्रपंच तुमच्यासाठीच... 

काय आहे याचा अर्थ?

पायरसी रोखण्यासाठी चॅनलनं उचललेलं हे पाऊल आहे. 'अॅन्टी-पायरसी'साठी हे क्रमांक तुमच्या टीव्ही स्क्रीनवर चॅनलकडून झळकावले जातात.

युनिक कोड क्रमांक

तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसणारे क्रमांक तुम्ही राहत असलेल्या भागासाठी अल्गोरिदमच्या साहाय्यानं तयार केले जातात. हा एक युनिक कोड क्रमांक असतो. टीव्हीवर सुरू असलेल्या व्हिडिओमध्ये हा क्रमांक थोड्या थोड्या वेळानंतर जोडला जातो.

खबरदार, पायरसीचा प्रयत्न केलात तर... 

तुम्ही जर एखाद्या कार्यक्रमाची किंवा सिनेमाची पायरसी करण्याचा प्रयत्न केला तर हा क्रमांकही तुम्ही रेकॉर्ड करत असलेल्या कॅमेऱ्यात किंवा रेकॉर्डिंग डिव्हाईसवरच्या व्हिडिओत दिसतो. 

या क्रमांकामुळे तुम्ही एखादा व्हिडिओची पायरसी केली असेल तर ती कुठून आणि कुणी केली हे सहज शोधून काढता येऊ शकतं.