एलजीचं नवं क्लासी स्मार्टवॉच बाजारात…

अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या I/O परिषदेत अनेक उत्पादकांनी विविध वस्तूंचं लॉन्चिंग केलंय. याच निमित्तानं ‘एलजी’नं आपलं स्मार्टवॉचही लॉन्च केलंय. 

Updated: Jun 28, 2014, 04:53 PM IST
एलजीचं नवं क्लासी स्मार्टवॉच बाजारात… title=

सॅनफ्रान्सिस्को : अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या I/O परिषदेत अनेक उत्पादकांनी विविध वस्तूंचं लॉन्चिंग केलंय. याच निमित्तानं ‘एलजी’नं आपलं स्मार्टवॉचही लॉन्च केलंय. 

याच टेक मेळाव्यात लॉन्च झालेले अॅन्ड्रॉईड 5.0.L, अॅन्ड्रॉईड ऑटो तसेच अनेक अॅन्ड्रॉईड, मोबाईल आणि फोन असे अनेक टेक्नोलॉजीचे नवीन प्रकार अशा अनेक प्रोडक्टस ग्राहकांना लवकरच वापरता येणार आहेत. याच वेळी एलजीनं आपलं स्मार्टवॉच लॉन्च करून ग्राहकांच लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न केलाय. एलजीचं हे वॉच ग्राहकांना गूगल प्ले वर उपलब्ध होईल.
 
‘एलजी’ स्मार्टवॉचची वैशिष्टयं...
-    63 ग्रॅम वजन
-    4 जीबी बिल्ट इन स्टोरेज
-    512 रॅम
-    400 मेगाहर्टझ बॅटरी
-    4.0 ब्लू टूथ कनेक्टिविटी
एलजीने या स्मार्टवॉचची किंमत 229 डॉलर (साधारणतः 13,740 रुपये) आहे.  हे स्मार्टवॉच अॅन्ड्रॉईडवर चालतं. जगातील 12 देशांतील लोकांना गूगल प्ले स्टेशनवरुन ऑर्डर देऊन हे स्मार्टवॉच विकत घेता येईल.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.