OnePlus Dash Sale: १ रुपयात खरेदी करा 6 GB रॅमचा वनप्लस ३T

 दिवाळी सेलनंतर आता वन प्लस डिसेंबर सेल ऑफर घेऊन आला आहे. हा सेल संपूर्ण डिसेंबर महिन्यात असणार आहे. या सेलमध्ये रजिस्टर्ड युजर्सला एक रुपयात कंपनीचा नुकताच लॉन्च झालेला स्मार्टफोन ३T विकत देणार आहे. 

Updated: Dec 5, 2016, 09:23 PM IST
OnePlus Dash Sale: १ रुपयात खरेदी करा 6 GB रॅमचा वनप्लस ३T title=

मुंबई :  दिवाळी सेलनंतर आता वन प्लस डिसेंबर सेल ऑफर घेऊन आला आहे. हा सेल संपूर्ण डिसेंबर महिन्यात असणार आहे. या सेलमध्ये रजिस्टर्ड युजर्सला एक रुपयात कंपनीचा नुकताच लॉन्च झालेला स्मार्टफोन ३T विकत देणार आहे. 

हा सेल ९, १६, २३ आणि ३० डिसेंबरला आहे. ऑललाइन स्टोअरवर सेल दुपारी १२ ते ६ वाजेपर्यंत चालणार आहे. 

यात सेलमध्ये ग्राहक वनप्लस ३T, वनप्लस एक्सेसरीज, केस, फोन कव्हर फक्त १ रुपयात खरेदी करू शकणार आहेत. 

या सेलसाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. यासाठी वनप्लसचे खाते तयार करावे लागणार आहे. तसेच मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनदेखील करावे लागणार आहे. तसेच आपला पत्ताही द्यावा लागणार आहे. 

तसेच या इव्हेंटला तुम्हांला सोशल मीडियावर शेअर करावे लागेल. 

तुम्ही शेअर केलेल्या लिंकच्या बदल्यात तुम्हांला पाइंट्स मिळते. वनप्लस ३T मिळण्यासाठी तुम्हांला ३०० पॉइंट्सची गरज आहे. यानंतर युजर्स वनप्लस ३T एक रुपयात खरेदी करू शकणार आहे. 

काय आहे वनप्लस ३Tचे वैशिष्ट्ये...

या स्मार्टफोनच्या खास फीचर्समध्ये 5.5 इंचचा डिस्प्ले आहे. त्याचे रिझल्यूशन 1920 x 1080
पिक्सल देण्यात आली आहे.  सोबत 6 जीबी की रॅम देण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्टफोन अजून चांगला झाला आहे.  फोन 64 जीबी आणि 128 जीबी दो मेमरी व्हेरिएंटमध्ये आहे. 

फोटोग्राफी फ्रंटमध्ये वनप्लस 3 प्रमाणे 3Tमध्ये  Sony IMX 298 सेंसरचा 16 मेगापिक्सल रिअर कॅमरा देण्यात आला आहे.  सेल्फी कॅमरेमध्ये कंपनीने मोठा बदल केला आहे.  वनप्लस 3Tमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमरा देण्यात आला आहे. हा 4k रिकॉर्डिंग सपोर्ट करत आहे. तसेच यात इंटेलिजेंट पिक्सल टेक्नॉलजी देण्यात आली आहे. कमी प्रकाशात चांगले फोटो काढण्यात येतील. 

बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर वनप्लस 3Tमध्ये 3,400mAhची बॅटरी देण्यात आली आहे.  वनप्लस 3च्या तुलनेत ही बॅटरी अधिक आहे. फोन क्विक चार्जिंग सपोर्टसोबत आहे. कंपनीने दावा केला आहे की, 30 मिनीट चार्ज केल्यानंतर संपूर्ण दिवसाची बॅटरी पूर्ण मिळू शकते.