अवघ्या साडेपाच हजारांत विंडोज १० टॅब्लेट

तुमच्या खिशाला सहज परवडेल असा नवा टॅब्लेट बाजारात आलाय. हल्ली चित्रपट पाहण्यासाठी, गेम खेळण्यासाठी स्मार्टफोनपेक्षा टॅब्लेटला अधिक पसंती असते. यामुळेच पँटेल टेक्नॉलॉजीने नवा पेंटा टी-पॅड डब्लू एस ८२० एक्स हा टॅब्लेट बाजारात आणलाय. 

Updated: Nov 22, 2015, 12:58 PM IST
अवघ्या साडेपाच हजारांत विंडोज १० टॅब्लेट title=

नवी दिल्ली : तुमच्या खिशाला सहज परवडेल असा नवा टॅब्लेट बाजारात आलाय. हल्ली चित्रपट पाहण्यासाठी, गेम खेळण्यासाठी स्मार्टफोनपेक्षा टॅब्लेटला अधिक पसंती असते. यामुळेच पँटेल टेक्नॉलॉजीने नवा पेंटा टी-पॅड डब्लू एस ८२० एक्स हा टॅब्लेट बाजारात आणलाय. 

अत्याधिनुक फीचर्स देण्यासह या टॅब्लेटची किंमतही कंपनीने सर्वसामांन्यांच्या खिशाला परवडेल अशी ठेवली आहे. अवघ्या ५,४९९ रुपयांत तुम्ही टॅब्लेट खरेदी करु शकता. 

असा आहे पेंटा टी-पॅड डब्लू एस ८२० एक्स 

आठ इंचाचा डिस्प्ले
१२८०x८०० पिक्सल
१६ जीबी इंटरनल मेमरी
१.३ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर
एक जीबी रॅम
दोन मेगापिक्सल रेयर आणि फ्रंट कॅमेरा
विंडोज १० 
बॅटरी - ४०००एमएएच, ३जी

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.