या शब्दांचे फुलफॉर्म तुम्हाला माहीत आहेत का?

हल्लीच्या व्यस्त शेड्यूल्डमुळे प्रत्येकजण शॉटकर्ट वापरतो. साध्या संवादापासून ते सोशल साईटवर केल्या जाणाऱ्या चॅटिंगमध्ये अधिकाधिक शॉटफॉर्मचा वापर केला जातो. केवळ मोठेच नाही तर लहानगे विद्यार्थ्यीही या शॉटकर्टचा वापर करु लागलेत. रोजच्या वापरातले अनेक शब्दही आपण शॉटकर्टमध्येच वापरतो. 

Updated: Oct 14, 2016, 01:29 PM IST
या शब्दांचे फुलफॉर्म तुम्हाला माहीत आहेत का? title=

मुंबई : हल्लीच्या व्यस्त शेड्यूल्डमुळे प्रत्येकजण शॉटकर्ट वापरतो. साध्या संवादापासून ते सोशल साईटवर केल्या जाणाऱ्या चॅटिंगमध्ये अधिकाधिक शॉटफॉर्मचा वापर केला जातो. केवळ मोठेच नाही तर लहानगे विद्यार्थ्यीही या शॉटकर्टचा वापर करु लागलेत. रोजच्या वापरातले अनेक शब्दही आपण शॉटकर्टमध्येच वापरतो. 

जाणून घ्या असेच काही रोजच्या वापरातील शब्दांचे फुलफॉर्म

1. PAN  - पैशांच्या देवाणघेवाणीदरम्यान पॅनकार्डचा ओळखपत्र म्हणून फायदा होतो. मात्र या पॅनकार्डचा फुलफॉर्म आहे परमनंट अकाऊंट नंबर(permanant account number).

2. PDF - अनेकांना पीड़ीएफचा फुलफॉर्म माहीत नसेल. पीडीएफ म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मट(portable document format)

3. HDFC - अनेकदा हा शब्द ऐकला असेल. HDFC म्हणजे 'हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (housing development finance corporation)
 
4. SIM - या शब्दाचा वापर 90 टक्के लोक करतात. मात्र नक्कीच तुम्हाला याचा फुलफॉर्म माहीत नसेल. सिमचा फुलफॉर्म सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल (Subscriber Identity Module) असा आहे.

5. ATM - याचा वापर तर 10 पैकी 8 लोक करतात. एटीएमचा फुलफॉर्म ऑटोमेटेड टेलर मशीन(Automated Teller Machine)               

6. IFSC - याचा फुलफॉर्म आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड() Indian Financial System Code) आहे. 

7. FSSAI(fssai) - याचा फुलफॉर्म आहे 'फुल सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया'

8. WI-FI - याचा फुलफॉर्म आहे 'वायरलेस फिडेलिटी'(wireless fidelity)आहे.