या कंपनीने बनविला सर्वात स्वस्त कम्प्युटर, किंमत ३०० रुपये

आतापर्यंत तुम्ही खूप स्वस्तातले कम्प्युटर पाहिले असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, तुम्हांला फक्त ३०० रुपयात कम्प्युटर मिळू शकेल. हो हे खरं आहे. मिनिएचर कम्प्युटर बनविणारी कंपनी रास्पबेरी पाईने असा कम्प्युटर बनिवला आहे जो सर्वात स्वस्त आहे. 

Updated: Nov 27, 2015, 02:52 PM IST
या कंपनीने बनविला सर्वात स्वस्त कम्प्युटर, किंमत ३०० रुपये  title=

नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही खूप स्वस्तातले कम्प्युटर पाहिले असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, तुम्हांला फक्त ३०० रुपयात कम्प्युटर मिळू शकेल. हो हे खरं आहे. मिनिएचर कम्प्युटर बनविणारी कंपनी रास्पबेरी पाईने असा कम्प्युटर बनिवला आहे जो सर्वात स्वस्त आहे. 

कंपनीने रास्पबेरी पाई 'झिरो' नावाने हा नवीन कम्प्युटर बनविला आहे. याची किंमत फक्त पाच डॉलर म्हणजे सुमारे ३०० रुपये आहे. याचे डायमेन्शन 65x30x5 मिलीमीटर आहे. कंपनीने दावा केला आहे की हा जगातील सर्वात स्वस्त कम्प्युटर आहे. 

याचे स्पेसिफिकेशन सांगायचे झाले तर यात  ब्रॉडकॉम BCM2835 अॅप्लिकेशन प्रोसेसर आहे. कंपनीनुसार मागील चिपसेट रास्पबेरी पाई १ पेक्षा ४० टक्के अजून फास्ट आहे. यात ५१२ एमबी रॅम आणि स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्डचा स्लॉट आहे. हा कम्प्यूटर लिनेक्सवर बेस्ड रास्पबियन ऑपरेटिंग सिस्टीमवर सुरू आहे. 

कनेक्टीव्हिडीसाठी एचडीएमआय सॉकिट दिला आहे. यात कम्पोजिड व्हिडिओ हेडर आहे. यात स्टँडर्ड यूएसबी पोर्ट नाही. त्यामुळे इतर डिव्हाइसला जोडण्यासाठी अतिरिक्त हबची गरज आहे. 

सध्या हा कम्प्युटर युके आणि अमेरिकेत मिळत आहे. भारतात याच्या मिळण्यावर संशय अजून काम आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.