'रिलायन्स जिओ' ग्राहकांना देणार आणखी एक सुखद धक्का?

मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ इंफोकॉम लवकरच ग्राहकांना आश्चर्याचा गोड धक्का देणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

Updated: Jan 17, 2017, 05:30 PM IST
'रिलायन्स जिओ' ग्राहकांना देणार आणखी एक सुखद धक्का? title=

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ इंफोकॉम लवकरच ग्राहकांना आश्चर्याचा गोड धक्का देणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

रिलायन्स जिओ आपल्या मोफत सेवा 31 मार्चनंतरही सुरू ठेवणार असल्याचं सांगण्यात येतंय. यापूर्वीच कंपनीनं प्रीपेड आणि पोस्टपेड प्लानचाही खुलासा केलाय.  

मुकेश अंबानी यांनी सप्टेंबर 2016 मध्ये आपल्या फोर जी सर्व्हिससोबत 'जिओ' नावाचं मोफत 4 जीबी डाटाचं सिमकार्ड बाजारात आणलं होतं. सुरूवातील फ्री कॉलिंग आणि फ्री अनलिमिटेड मोबाईल डाटाची जिओची ऑफर 31 डिसेंबरपर्यंत होती... परंतु, ही ऑफर 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली. 31 डिसेंबरला 'वेलकम ऑफर' संपल्यानंतर रिलायन्सनं 'हॅप्पी न्यू ईअर' नावानं मोफत डाटा आणि कॉल ऑफर जाहीर केली. 

रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या सध्या 7.24 करोडवर पोडलीय. गेल्याच महिन्यात जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, मार्चच्या शेवटपर्यंत रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या 10 करोडपर्यंत पोहचेल. अशा वेळी रिलायन्स मार्केटमध्ये आपला दबदबा कायम राखण्यासाठी मोफत सुविधांची ऑफर 31 मार्चनंतरही सुरू ठेवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.  

दरम्यान, ट्रायच्या नियमांनुसार 1000 कॉलमध्ये पाचहून अधिक कॉल ड्रॉप होता कामा नये, परंतु, जिओहून एअरटेल नेटवर्कवर जाणाऱ्या फोन कॉलमध्ये 'कॉल ड्रॉप रेट' दर 175 कॉल प्रति हजार आहे.