सॅमसंगचा जबरदस्त फ्लॅगशिप नोट -५ भारतात लॉन्च

स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगनं दिल्लीतील एका इव्हेंटमध्ये हाय एंड स्मार्टफोन कम फॅबलेट गॅलेक्सी Note 5 भारतात लॉन्च केलाय.  ३२ जीबी वॅरिएंट असलेल्या फोनची किंमत ५३,९०० तर ६४जीबी वॅरिएंटच्या फोनची किंमत ५९९०० रुपये असेल.

Updated: Sep 8, 2015, 09:23 AM IST
सॅमसंगचा जबरदस्त फ्लॅगशिप नोट -५ भारतात लॉन्च title=

नवी दिल्ली: स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगनं दिल्लीतील एका इव्हेंटमध्ये हाय एंड स्मार्टफोन कम फॅबलेट गॅलेक्सी Note 5 भारतात लॉन्च केलाय.  ३२ जीबी वॅरिएंट असलेल्या फोनची किंमत ५३,९०० तर ६४जीबी वॅरिएंटच्या फोनची किंमत ५९९०० रुपये असेल.

सॅमसंगनं मागील महिन्यान न्यू यॉर्कमध्ये एका इव्हेंटदरम्यान आपले दोन नवे फॅबलेट गॅलेक्सी नोट ५ आणि गॅलेक्सी S6 एज+ लॉन्च केले होते. 

आणखी वाचा - सॅमसंगचा सर्वात स्लीम Galaxy S2 टॅब भारतात लॉन्च

- सॅमसंग नोट ५ सॅमसंगच्या नोट ४च्या तुलनेत अधिक स्लिम आहे. 
- नोट ५चा डिस्प्ले ५.७ इंच आहे. गॅलेक्सी S6 एज प्लसमध्येही ५.७ इंचची स्क्रीन दिली गेलीय.

नोट ५चं महत्त्वाचं फीचर

नोट ५मध्ये कंपनीनं एक जबरदस्त फीचर जोडलंय. हे फीचर म्हणजे रोटेट की-बोर्ड. या की बोर्डच्या मदतीनं आपण नोट ५ सोबत असलेल एक फिजिकल की-बोर्डही ऑपरेट करू शकता. कीबोर्ड गरज नसल्यास पुन्हा रोटेट करून संपूर्ण स्क्रीनचा वापर करू शकतो. 

सॅमसंग पे सर्व्हिसही लॉन्च

दोन्ही फोनसोबत सॅमसंग पे नावाची एक सर्व्हिसही कंपनीनं लॉन्च केलीय. या सर्व्हिसचा वापर केल्यानंतर आपल्याला क्रेडिट कार्ड आणि इतर कार्ड सोबत ठेवण्याची गरज नसेल. स्मार्टफोनमध्येच व्हर्च्युअल की-बोर्ड द्वारे तुम्ही पेमेंट करू शकाल. सॅमसंग पे २० ऑगस्टला कोरियामध्ये, २८ सप्टेंबरला यूएसमध्ये आणि नंतर यूके, स्पेन आणि चीनमध्ये लॉन्च केलं जाईल. 

सॅमसंग नोट-५ चे इतर फीचर्स
- अँड्रॉइड ५.१.१ ऑपरेटिंग सिस्टिम
- 1440x2560 पिक्सेल ५.७ इंचचा  QHD सुपर-अमोल्ड डिस्प्ले 
- दोन्ही फोनमध्ये पावरफुल ऑक्टा-कोर Exynos 7420 प्रोसेसर 
- स्मार्टफोनमध्ये दोन मेमरी व्हॅरिएंट्स ३२ जीबी आणि ६४ जीबी, यात मायक्रो एसडी कार्डचं ऑप्शन दिलं नाहीय. 
- ४जीबी LPDDR4 रॅम दिलंय. कंपनीच्या सीईओनुसार सॅमसंगच्या आतापर्यंतच्या स्मार्टफोन्स पैकी सर्वाधिक रॅम आहे.
- दोन्ही फोनमध्ये १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि सेल्फी प्रेमींसाठी खास ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा 
- ३००० mAh दमदार बॅटरी
- दोन्ही फोनमध्ये 4G LTE कनेक्टिव्हिटी दिली गेलीय. सोबतच ब्लू-टूथ ४.२, वाय-फाय 802.11 a/b/g/n/ac, GPS/ A-GPS,मायक्रो USB 2.0 कनेक्टिव्हिटीचं ऑप्शन दिलं गेलंय.
- स्मार्टफोन व्हाइट पर्ल, ब्लॅक सेपिअस, गोल्ड प्लेटिनम आणि सिल्व्हर टायटेनियम कलर्समध्ये अॅव्हेलेबल असेल. 

आणखी वाचा - सॅमसंगचा नवा स्मार्टफोन Galaxy J1 Ace अवघ्या 6,400 रुपयांत!

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.