मंदीत गमावली नोकरी... आज स्वबळावर झालीय करोडोंची मालकीण!

एकेकाळी मंदीमुळे हातात असलेली नोकरी गमवावी लागली... त्यामुळे रडकुंडीला आलेली सौम्या आज स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर करोडपती बनलीय. पडत्या-उभं राहण्याच्या काळात नातेवाईकांनी मारलेल्या टोमण्यांनीच आपल्याला आज इथवर पोहचवलंय, असं सौम्या गुप्ता सांगते. 

Updated: Apr 19, 2016, 04:18 PM IST
मंदीत गमावली नोकरी... आज स्वबळावर झालीय करोडोंची मालकीण! title=

मुंबई : एकेकाळी मंदीमुळे हातात असलेली नोकरी गमवावी लागली... त्यामुळे रडकुंडीला आलेली सौम्या आज स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर करोडपती बनलीय. पडत्या-उभं राहण्याच्या काळात नातेवाईकांनी मारलेल्या टोमण्यांनीच आपल्याला आज इथवर पोहचवलंय, असं सौम्या गुप्ता सांगते. 

फॅशन... एक उद्योग!

सौम्या एक उद्योजिका आहे. आपल्या 'फॅशन अॅन्ड यू' नावाचं ऑनलाईन फॅशन स्टोअरसाठी ती चांगलीच प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षीचा 'वुमन एन्टरप्रेन्योअर २०१५' चा अॅवॉर्ड तिला देण्यात आला होता. 'टेन ऑन टेन'वर महिलांसाठी फॅशनेबल ड्रेसेस ती उपलब्ध करून देते. 

पायलट बनण्याचं स्वप्न

सौम्या आज प्रगती पथावर असली तरी काही वर्षांपूर्वी मात्र तिची इच्छा काही वेगळीच होती. तिला पायलट बनायचं होतं. यासाठी आपलं बारावीपर्यंतचं शिक्षण मुंबईत पूर्ण केल्यानंतर तिननं ५० लाख खर्चून यूएसमध्ये पायलट बनण्याचं प्रशिक्षणही घेतलं. 

आत्मविश्वासाला धक्का

परंतु, २००८ साली आलेल्या मंदीमध्ये मात्र सौम्याला आपली नोकरी गमवावी लागली. हा सौम्यासाठी मोठा धक्काच होता. तिनं हरएक पद्धतीनं दुसरी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, हा प्रयत्न निष्फळ ठरला. तिचा आत्मविश्वास कमी पडू लागला होता. पण, यावेळी तिला खंबीरपणे साथ दिली ती तिच्या आई-वडिलांनी... 

फॅशनची धरली कास!

सौम्यानं यानंतर एका कॉलसेंटरमध्ये २० हजार रुपये महिन्यावर नोकरी पत्करली... सोबतच सौम्यानं फॅशनेबल कपडे विकण्यासाठी आपला हात आजमावणं सुरू केलं. फॅशनेबल कपडे मिळवणं, त्यांना आकार देऊन आणखी आकर्षक बनवणं, त्यांच्यासाठी ग्राहक शोधणं यावर तिनं आपलं लक्ष केंद्रीत केलं... यासाठी तिनं अनेक कॉलेज तरुणींना आपलं मॉडेल बनवलं. सध्या फॅशनच्या जगात सौम्यानं आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलीय.