सोनीचा एक्सपीरिया टी-3 बाजारात.

Updated: Jul 24, 2014, 08:20 PM IST
सोनीचा एक्सपीरिया टी-3 बाजारात. title=

सोनी या इलेक्ट्रॉनिक कंपनीने आपला नवीन फॅबलेट एक्सपीरिया टी-3 विक्रीसाठी भारतीय बाजारात उतरवला आहे. सोनीने असं म्हंटल आहे की, हा जगातला सर्वात बारीक फोन आहे. याचं वजन 148 ग्राम आहे. यामध्ये क्वाडकोर सीपीयू तसचं 2500 एमएएचची बॅटरी आहे. 

याचं स्क्रीन 5.3 इंच एवढं आहे आणि हा 7 मिलीमीटर एवढा तो बारिक आहे. हा स्मार्टफोन '4जी'लाही सपोर्ट करतो आणि किटकॅटने चालतो. याची विशेषता म्हणजे हा प्रीमियम मटेरियलपासून बनवला आहे. याचं स्क्रीन 1280x720 पिक्सल रिजॉल्यूशन एवढं असल्याने फोटो स्पष्ट येतात. 

3जी, 4जी, वाय-फाय, ब्लूटुथ 4.0 आणि जीपीएसयाचे टी3 इतर फीचर आहेत. यात 1.4 जीएचजेड कॅाडकोर (स्नॅपड्रॅगन) प्रॉसेसर असून 4 जीबी रॅम आणि 32 जीबीचं एक्सटर्नल कार्ड सपोर्टर आहे. 

फ्रंट कॅमरा 1.1 मेगापीक्सल आणि प्रायमरी कॅमेरा 8 मेगापिक्सल असून सोनी एक्समोर सेंसर लावलं आहे. ज्यामुळे पिक्चर क्वालिटी चांगली राहते. क्विक ऑटो फोकस आणि इमेज स्टेबलाइजेशन असल्याने फुल हाय डेफिनेशन वीडियो रेकॉर्डिंग होतं. 

बॅटरी जास्त वेळ टिकावी म्हणून यामध्ये बॅटरी स्टैमिना मोडची सुविधा दिली आहे. याची किंमत 27,990 रुपये आहे आणि 28जुलै पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.