जिओच्या 'धन धना धन' ऑफरचा आज शेवटचा दिवस

रिलायन्स जिओच्या 'धन धना धन' ऑफरचा आज शेवटचा दिवस आहे. सुरुवातीला ही ऑफर १५ एप्रिलला संपणार होती मात्र कंपनीने ही ऑफर एका दिवसांनी वाढवून १६ एप्रिलपर्यंत केलीये. त्यामुळे जिओच्या ज्या ग्राहकांनी अद्याप ही ऑफर घेतली नसेल तर त्यांच्यासाठी आज शेवटची संधी आहे.

Updated: Apr 16, 2017, 05:52 PM IST
जिओच्या 'धन धना धन' ऑफरचा आज शेवटचा दिवस title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या 'धन धना धन' ऑफरचा आज शेवटचा दिवस आहे. सुरुवातीला ही ऑफर १५ एप्रिलला संपणार होती मात्र कंपनीने ही ऑफर एका दिवसांनी वाढवून १६ एप्रिलपर्यंत केलीये. त्यामुळे जिओच्या ज्या ग्राहकांनी अद्याप ही ऑफर घेतली नसेल तर त्यांच्यासाठी आज शेवटची संधी आहे.

ज्या ग्राहकांनी १५ एप्रिलपर्यंत ३०९ अथवा ५०९ रुपयांपैकी एकही रिचार्ज केलेले नाहीये त्यांच्यासाठी आजचा दिवस शेवटचा आहे. कंपनीकडून ग्राहकांना 'धन धना धन' ऑफरचा लाभ घेण्यासाठी आज अखेरच्या दिवशीही मेसेज पाठवले जातायत.

९९ रुपये भरुन प्राईम मेंबरशिप घेतलेले ग्राहक धन धना धन ऑफरअंतर्गत ३०९ रुपयांचे रिचार्ज करुन दिवसाला १ जीबी डेटा, फ्री कॉलिंग, जिओ अॅप्स आणि प्रति दिवस १०० एसएमएसचा लाभ घेऊ शकतात.