VIDEO : हा व्हिडिओ तुम्हालाही भावूक करेल

आयुष्यात तुम्ही एखाद्या वेळेस अॅडव्हेन्चर म्हणून केलेलं काम आमच्यासाठी मात्र दररोजचा खेळ आहे... हे आर्मिच्या जवानांचं वक्तव्य खरंच आहे. 

Updated: Jan 28, 2016, 01:40 PM IST

मुंबई : आयुष्यात तुम्ही एखाद्या वेळेस अॅडव्हेन्चर म्हणून केलेलं काम आमच्यासाठी मात्र दररोजचा खेळ आहे... हे आर्मिच्या जवानांचं वक्तव्य खरंच आहे. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त सोशल मीडियावर वायरल झालेला एक व्हिडिओ हेच तर सांगतोय... इंटरनेटवर वायरल होणारा हा व्हिडिओ त्या सगळ्या सैनिकांसाठी एक श्रद्धांजली आहे ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची, आपल्या नात्यांची, आपल्या भावनांची आहुती दिलीय. 

'शॉर्टफिल्मवाला'द्वारे बनवण्यात आलेली ही एक शॉर्ट फिल्म आहे. अवघ्या ५० सेकंदांचा हा व्हिडिओ तुम्हालाही भावूक होण्यासाठी भाग पाडू शकतो.