... जेव्हा धावत्या कारमध्ये ड्रायव्हरच्या छातीतून निघाला हात

मोठ्या शहरांमध्ये आपण नेहमी पाहतो की, लोकं रस्त्यानं जाणाऱ्या धावत्या कारमध्ये लिफ्ट मागतात. मदतीच्या अपेक्षेनं अनेकदा गाडी चालकही लिफ्ट देतात. पण जर लिफ्ट दिल्यानंतर गाडीत काही घडलं तर... असं काही जे आपण स्वप्नातही घडले असं वाटत नाही. 

Updated: Sep 8, 2015, 04:25 PM IST
... जेव्हा धावत्या कारमध्ये ड्रायव्हरच्या छातीतून निघाला हात title=

नवी दिल्ली: मोठ्या शहरांमध्ये आपण नेहमी पाहतो की, लोकं रस्त्यानं जाणाऱ्या धावत्या कारमध्ये लिफ्ट मागतात. मदतीच्या अपेक्षेनं अनेकदा गाडी चालकही लिफ्ट देतात. पण जर लिफ्ट दिल्यानंतर गाडीत काही घडलं तर... असं काही जे आपण स्वप्नातही घडले असं वाटत नाही. 

असंच काहीसं काही लोकांसोबत झालं. ते गाडीत बसले तर खरे पण जेव्हा गाडीतून उतरले तेव्हा भीतीनं त्यांची हालत खराब झाली होती.

धावत्या गाडीतील नजारा पाहून त्यांची झोपच उडाली. ड्रायव्हिंग सिटवर बसलेला व्यक्ती आरामात गाडी चालवतोय. पण अचानक त्याच्या छातीतून एक हात बाहेर आला. रक्तानं माखलेला हा हात होता. एवढंच नव्हे तर त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीकडे तो हात वळाला. धावत्या गाडीतील हा भयंकर नजारा पाहून लोकांना धक्का बसला. हा व्हिडिओ यू-ट्यूबर वायरल होतोय. हा एक प्रँक व्हिडिओ आहे. 

पाहा व्हिडिओ - 

व्हिडिओ सौजन्य: PrankBaaz - Bach Ke Rehna re Baba !

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.