एसयूव्ही ताफ्यात 'वोल्वो एक्ससी 90' दाखल...

स्वीडनची कार कंपनी असलेल्या वोल्वोनं आपल्या एसयूव्ही ताफ्यात आणखी एका शानदार गाडीचा समावेश केलाय.

Updated: Aug 19, 2015, 02:56 PM IST
एसयूव्ही ताफ्यात 'वोल्वो एक्ससी 90' दाखल... title=

नवी दिल्ली : स्वीडनची कार कंपनी असलेल्या वोल्वोनं आपल्या एसयूव्ही ताफ्यात आणखी एका शानदार गाडीचा समावेश केलाय.

'एक्ससी 90' ही गाडी नव्या स्वरुपात सादर करण्यात आलीय. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, वोल्वो एक्ससी ९० साठी तुम्ही आजपासून ऑर्डर करू शकणार आहात. 

या गाडीची दिल्ली शोरुम किंमत आहे ७७.० लाख रुपये. गाडीच्या इंस्क्रिप्शन ट्रिम स्वरुपातील गाडीची किंमत ७७.९ लाख रुपये तर मोमेंटम ट्रिम स्वरुपातील गाडीची किंमत ६४.९ लाख रुपये असेल. 

या गाडीचा पुरवठा मात्र सप्टेंबर २०१५ पासून सुरू होणार आहे. वोल्वो ऑटो इंडिया सध्या भारतात पाच मॉडेल्सच्या कार विकल्या जातात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.