केप्सा म्हणजे काय रे भाऊ?

केप्सा हा शब्द पहिल्यांदा जेव्हा कानावर पडतो, तेव्हा अनेक जणांचा प्रश्न असतो, केप्सा म्हणजे काय?, तर.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 10, 2017, 11:45 AM IST

मुंबई  : केप्सा हा शब्द पहिल्यांदा जेव्हा कानावर पडतो, तेव्हा अनेक जणांचा प्रश्न असतो, केप्सा म्हणजे काय?, तर केप्सा हा खाण्याचा पदार्थ आहे, केप्सात तंदुरी, उकळलेली अंडी, काकडी, टॉमॅटो स्लाईस आणि बिर्याणीसारखा राईस असतो.

एक केप्सा  कमीत कमी ३ ते ४ जणं खातात. केप्साची टेस्टही लाजवाब असते, असं म्हणतात. मुंबईतील भायखळ्यात अफजल केप्सा तसा फेमस आहे, किंग्ज ऑफ केप्सा असं ते म्हणतात. तुम्हाला केप्सा खायची इच्छा असेल तर येथे जाऊन केप्सा नक्की खा.