जिओचं सिम खराब झालं किंवा हरवलं तर...

जर तुमचं जिओ सिम कुठे हरवलं असेल किंवा खराब झालं असेल तर चिंता करु नका. अनेक जण तर नवं कार्ड घेण्यासाठी जिओ स्टोर, डिजिटल एक्सप्रेस मिनी स्टोर किंवा रिलायंस डिजिटल स्टोरमधील जातील पण कोणतेही स्टोर जियो सिम रिप्लेसमेंट देत नाहीत. मग अशा स्थितीत मग काय करणार ?

Updated: May 7, 2017, 04:08 PM IST
जिओचं सिम खराब झालं किंवा हरवलं तर... title=

मुंबई : जर तुमचं जिओ सिम कुठे हरवलं असेल किंवा खराब झालं असेल तर चिंता करु नका. अनेक जण तर नवं कार्ड घेण्यासाठी जिओ स्टोर, डिजिटल एक्सप्रेस मिनी स्टोर किंवा रिलायंस डिजिटल स्टोरमधील जातील पण कोणतेही स्टोर जियो सिम रिप्लेसमेंट देत नाहीत. मग अशा स्थितीत मग काय करणार ?

कंपनीने सिम रिप्लेसमेंट आणि मायग्रेशन संबंधीत समस्यांसाठी स्पेशल सर्विस सेंटर बनवले आहे. या सर्विस सेंटरवर जिओ संबंधित समस्या सोडवल्या जातात. हे सर्विस सेंटर जिओ सिम रिप्लेसमेंट, मायग्रेशन सारख्या समस्या सोडवण्यासाठी बनवले गेले आहेत.

जर तुम्ही जिओ स्टोर, डिजिटल एक्सप्रेस मिनी स्टोर किंवा रिलायंस जिओ स्टोरवर जाता तर तेथे तुम्हाला या स्पेशल स्टोरवर जाण्याचा सल्ला दिला जातो. या स्टोरवर तुम्ही तुमच्या जिओ सिमला पोस्टपेड किंवा प्रीपेडमध्ये कनवर्ट करु शकता. कोणतीही माहिती हवी असल्यास जिओच्या कस्टमर केअरवर फोन करुन विचारु शकता.