अमेरिकेसह भारतात ठप्प झाले व्हॉट्सअॅप

 मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप मंगळवारी रात्री काही काळासाठी जगभरात ठप्प झाले होते. 'आरटी डॉट कॉम'ने दिलेल्या बातमीनुसार, लाखो युजर्सने ही तक्रार केली की व्हॉट्सअॅप मेसेज सेंट होत नाही किंवा येत नाही. 

Updated: Jan 26, 2016, 04:21 PM IST
अमेरिकेसह भारतात ठप्प झाले व्हॉट्सअॅप  title=

मुंबई :  मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप मंगळवारी रात्री काही काळासाठी जगभरात ठप्प झाले होते. 'आरटी डॉट कॉम'ने दिलेल्या बातमीनुसार, लाखो युजर्सने ही तक्रार केली की व्हॉट्सअॅप मेसेज सेंट होत नाही किंवा येत नाही. 

या देशांनामध्ये बंद होते व्हॉट्सअॅप
व्हॉट्सअॅप ठप्प झालेल्या देशांमध्ये जपान, भारत, मलेशिया, कोलंबिया आणि अमेरिका यांचा समावेश आहे.  बहुतांशी देशात ही समस्या एका तासात दुरूस्त झाली. फेसबूकने यावर अजून काहीही टिप्पणी दिली नाही. व्हॉट्सअॅप जगातील सर्वाधिक वापरलं जाणारे मेसेजिंग अॅप आहे. 

ट्विटर पण झाले होते डाऊन
गेल्या आठवड्यात मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर दोन दिवसांसाठी काही वेळासाठी डाऊन होती. यामुळे युजर्स मोबाईल अॅप आणि वेब ट्विटर एक्सेस करू शकत नव्हते.