तुमचं व्हॉटस्अप प्रोफाईल सुरक्षित नाही

तुमच्या मोबाईलमध्ये सध्या कार्यरत असलेलं व्हॉटस् अप तुम्ही सुरक्षिततेची खात्री केल्यानंतरही सुरक्षित नाही, हे तुम्हाला समजलं तर... होय, हे खरं आहे.

Updated: Feb 4, 2015, 03:58 PM IST
तुमचं व्हॉटस्अप प्रोफाईल सुरक्षित नाही title=

मुंबई : तुमच्या मोबाईलमध्ये सध्या कार्यरत असलेलं व्हॉटस् अप तुम्ही सुरक्षिततेची खात्री केल्यानंतरही सुरक्षित नाही, हे तुम्हाला समजलं तर... होय, हे खरं आहे.

व्हॉटस्अपमध्ये सुरक्षिततेची हमी देणारे ऑप्शन्स निवडल्यानंतरही सुरक्षिततेत त्रुटी असल्याचं समोर आलंय. या त्रुटीमुळेच तुमचा व्हॉटस्अपवरचा फोटो तुम्ही सुरक्षित केला असेल तरीदेखील तो कुणीही सहज पाहू शकतोय. 

व्हॉटस्अपमध्ये सेटिंगमध्ये जाऊन प्रोफाईल पिक्चर 'only contact' हा ऑप्शन तुम्ही निवडला असेल तरी तो व्हॉटस्अपच्या वेबसाईटवर कुणालाही सहज दिसू शकतोय. 

व्हॉटस्अपनं नुकतंच व्हॉटस्अप डेस्कटॉपवर वापरता येण्यासाठी वेब इंटरफेस लॉन्च केलंय. मोबाईल फोन अॅप्लिकेशन वेब इंटरफेससोबत योग्यरित्या सिंक न झाल्यानं त्याचा फटका या अॅप्लिकेशनच्या यूझर्सना बसतोय. 

इतकंच नाही तर, युझर्सच्या फोनअॅपमधून एखादा कॉन्टॅक्ट डिलीट केलेला असेल तरीदेखील वेब अॅपवर यूझर्सचा प्रोफाईल फोटो दिसू शकतोय.  

ही काही फार मोठी गंभीर समस्या नसली तरी ज्या युझर्सना आपला फोटो प्रायव्हेट ठेवायचा असेल त्यांना नाहक याचा त्रास होऊ शकतो. एक अॅप्लिकेशन म्हणून या गोष्टीची काळजी घेणं महत्त्वाचं होतं, असं युझर्सचं म्हणणं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.