दाढी असलेले तरुण मुलींना का आवडतात?

 सध्या दाढी ठेवणे हे पुरुषांसाठी स्टाईल स्टेटमेंट झालेय. दाढी असलेले पुरुष तरुणींना रफ टफ वाटतात. त्यामुळे तरुणी दाढी असलेल्या पुरुषांकडे अधिक आकर्षित होतात. 

Updated: Apr 22, 2016, 10:50 AM IST
दाढी असलेले तरुण मुलींना का आवडतात? title=

मुंबई :  सध्या दाढी ठेवणे हे पुरुषांसाठी स्टाईल स्टेटमेंट झालेय. दाढी असलेले पुरुष तरुणींना रफ टफ वाटतात. त्यामुळे तरुणी दाढी असलेल्या पुरुषांकडे अधिक आकर्षित होतात. 

ही आहेत कारणे

ज्या तरुणांना दाढी असते ते मुलींना स्ट्राँग वाटतात. यामुळेच तरुणींना दाढी असलेले तरुण अधिक आवडतात. 

दाढी असलेली मुले तरुणींना मॅच्युअर वाटतात. त्यामुळे मुली अशा तरुणांच्या प्रेमात पडतात. 

क्लीन शेव्ह असलेले पुरुष थोडेसे लाजरे असतील अथवा तितकेचे स्ट्राँग नसतील असे काही तरुणींचे मत असते. याच कारणामुळे तरुणींना क्लीन शेव्हपेक्षा दाढी असलेले तरुण पसंत पडतात.

दाढी असलेल्या मुलांचा लूक तरुणींना हॉट वाटतो. हेही मुलींना दाढी असलेले पुरुष आवडण्यामागे एक कारण आहे.