यामाहाच्या 'स्मॉल बाईक'ची बाजारात एकच चर्चा...

जपानी कंपनी 'यामाहा' लवकरच सर्वात कमी किंमतीची बाईक आपल्या समोर सादर करणार असल्याचं समजतंय. 

Updated: Jul 2, 2014, 08:13 PM IST
यामाहाच्या 'स्मॉल बाईक'ची बाजारात एकच चर्चा...  title=

मुंबई : जपानी कंपनी 'यामाहा' लवकरच सर्वात कमी किंमतीची बाईक आपल्या समोर सादर करणार असल्याचं समजतंय. 

या नव्या बाईकची किंमत जवळपास 30 हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जातेय. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक लहान बाईक बनविण्याच्या दृष्टीने कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बाईकचं काम कधीपर्यंत पूर्ण होऊ शकेल आणि कधीपर्यंत ही बाईक बाजारात उतरविली जाईल, याबाबत मात्र अनिश्चितता आहे.  

ही नवी बाईक 100 सीसी किंवा 110 सीसी सेगमेंटमध्ये असेल असं समजतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी या बाईकला मेन्टेनन्सचाही ताप कमी करणार असल्याचं सांगतेय.

कंपनीनं ही बाईक पहिल्यांदा ग्रामीण भागात लॉन्च करणार असल्याचं ठरवलंय. या बाईकवर बाजारात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मात्र त्यावेळी कंपनीने त्यावेळी लक्ष दिलं नाही.

मीडियाशी बोलताना 'यामाहा मोटर रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट'चे एमडी कोबायाशी यांनी 'या प्रोजेक्टवर काम सुरु आहे. हा प्रोजेक्ट उत्तमोत्तम बनवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत' असं म्हटलंय. या बाईकमुळे हिरो, होंडा, स्प्लेंडर या कंपन्यांच्या या सेंगमेंटला चांगलीच स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातेय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.