यूट्युबची आता बफरमुक्त ऑफलाईन व्हिडिओ सेवा

मोबाईलवर वाढता वापर लक्षात घेऊन युट्युबने भारतात बफरमुक्त ऑफलाइन व्हिडिओची सेवा सुरू करत असल्याची घोषणा केलीय.

Updated: Dec 16, 2014, 07:34 PM IST
यूट्युबची आता बफरमुक्त ऑफलाईन व्हिडिओ सेवा title=

मुंबई : मोबाईलवर वाढता वापर लक्षात घेऊन युट्युबने भारतात बफरमुक्त ऑफलाइन व्हिडिओची सेवा सुरू करत असल्याची घोषणा केलीय.

यूट्युब अ‍ॅपच्या या नव्या ऑफलाइन फीचरमुळे युझर्सना वाय-फाय किंवा डेटा प्लॅनचा वापर करून ऑफलाईन व्हिडिओज घेता येतील.

हे व्हिडिओ घेतल्यानंतर ४८ तासांपर्यंत इंटरनेट कनेक्शनशिवाय ते पाहता येणे शक्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

या सेवेमुळे बफरिंगचा मनस्ताप टळणार असून व्हिडिओ फ्रेमच्या आत असलेल्या ऑफलाईन आयकॉनवर टॅप करून युझर्स हे व्हीडिओ अ‍ॅड करू शकतील.

'अँड्रॉइड वन' स्मार्टफोनच्या लाँचिंगच्या वेळी युट्युबने अँड्रॉइड आणि आयओएस या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी ऑफलाईन फीचरची घोषणा केली होती. 

भारतामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ८५ टक्के लोक हे मोबाईलद्वारे इंटरनेटशी जोडले गेलेले आहेत.

या देशातील आमच्याकडे येणारा ४० टक्के डेटा हा मोबाईलवरून येतो. यामुळे नव्या फीचरसह डेटा कनेक्शन, वेग आणि खर्च अशा आव्हानांवर मात करणे शक्य असल्याचे युट्युबच्या इंजिनीअरिंग विभागाचे उपाध्यक्ष जॉन हार्डिग म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.