तुम्ही स्मार्टफोन वापरताय, मग या पाच चुका टाळा

आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. मात्र, हा स्मार्टफोन वापरताना तुमच्या हातून ५ चुका होतात. त्या तुम्ही टाळण्यासाठी या काही टिप्स...

Updated: Sep 5, 2015, 09:32 PM IST
तुम्ही स्मार्टफोन वापरताय, मग या पाच चुका टाळा  title=

मुंबई : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. मात्र, हा स्मार्टफोन वापरताना तुमच्या हातून ५ चुका होतात. त्या तुम्ही टाळण्यासाठी या काही टिप्स...

आपण स्मार्टफोन वापरताना आपल्या हातून हमखान काही  चुका होतात. परंतु या चुका शिल्लक असतात. त्यामुळे तुमचा पोपट होण्याची शक्यता  अधिक असते. त्या टाळणे आपल्या हातात आहे. 
 
१) k (के)
तुम्ही ओके एेवजी केवळ के म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे ok असे म्हणणे संयुक्त आहे. तसेच स्पेलिंग चेक आपल्या फोनमध्ये असते. त्याचा वापर न करता तुम्ही पोस्ट केली तर तुमचा अज्ञानपणा ऊघड होतो. त्यामुळे ही चूक नेहमी टाळा.
 
2) ok
तुम्ही एकाद्या मेसेजला रिप्लाय देताना ok असं म्हणू नका. कार्पोरेट कल्चरमध्ये बॉसला ओके म्हणून रिप्लाय देणं हे उद्धटपणाचं मानलं जातं. पण बॉसला रिप्लाय देताना ओके असं देऊ नका. नाही तर बॉस रागला म्हणून समजा.  बॉसला रिप्लाय देताना शुअर, आय विल, थॅँक्स, बघतो, करतो, विल डू असं उत्तर पाठविणे योग्य. ओके म्हणणं म्हणजे तुम्ही स्वत:ला फार शहाणे समजता  असे होते.
 
3) नो स्मायली
आपल्या स्मार्टमध्ये स्मायलीचा एक पर्याय असतो. त्या कधी पाठवायच्या याचा एक अलिखित नियम आहे. आपण कुणाला स्मायली पाठवतोय याचा काही विचार करायला पाहिजे. तो करत नाही. वाट्टेल त्या स्मायली आणि स्टिकर बिंधास्त पाठवली जातात. मात्र, कार्पोरेट कल्चरमध्ये या स्माईला स्थान नाही. त्या पाठविल्या तर तुमचा असभ्यपणा दिसून येतो.

4) कॉल मी, मेसेज चुकीचा
बऱ्याचवेळा आपण एखाद्याला फोन किंवा कॉल करतो. अनेकवेळा फोन उचला जात नाही. पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. मात्र फोन उचला गेला नाही तर आपण तात्काळ मेसेज टाइप करतो, कॉल मी. हा तुमचा असभ्यपणा होतो. कॉल आपण करतो. दुसरा फोन उचलत नाही. त्यामुळे तुम्हाला गरज असते त्याला नाही. त्यामुळे कॉल मी करणे योग्य नाही. त्यामुळे तुम्ही मेसेज करुन तुमचं नाव, गाव, काम याबाबत दोन ओळीचा मेसेज करणे योग्य.

5) फोटो पाठवताना विचार करा
तुम्ही एकमेकांना फोटो पाठवता. मात्र, ज्यांच्याशी ओळख आहे त्यांना असे फोटो पाठवा, अन्यथा तुमच्या इमेजचा कचरा झाला म्हणून समजा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.