इस्राइलने 'करून दाखवलं', आता भारत करणार!

भारतसोडून जवळपास सर्व जगाने नाकारलेला देश म्हणजे इस्त्राईल. खरं तर हाकललेल्या मूठभर माणसांनी दिशा देऊन घडवलेल्या देश म्हणजे इस्त्राईल. निसर्गाशी फारशी कृपा नसलेला भुपद्रेश म्हणजे इस्त्राईल. मात्र इस्त्रायलची प्रगतीही सर्वांनाच थक्क करणारी आहे.

Updated: Feb 27, 2012, 12:38 PM IST

www.24taas.com, विक्रम काजळे, इस्राइल

 

भारतसोडून जवळपास सर्व जगाने नाकारलेला देश म्हणजे इस्राइल. खरं तर हाकललेल्या मूठभर माणसांनी दिशा देऊन घडवलेल्या देश म्हणजे इस्त्राईल. निसर्गाशी फारशी कृपा नसलेला भुपद्रेश म्हणजे इस्राइल. अशा सर्वच अडीअडचणीत जन्मलेल्या देश हा भारता इतक्याच वयाचा झाला आहे. मात्र इस्राइलची प्रगतीही सर्वांनाच थक्क करणारी आहे.
इस्राइलच्या शेतीचे सर्वांत महत्वाचे वैशिष्टये म्हणजे ती उच्च तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यात पाणीवापर, तंत्रज्ञान,कृषी संशोधन तसच शेतीमध्ये वापरण्यात येणारी अवजारे यांचा उल्लेख करावा लागेल. आज अस्तित्वात आणि प्रचलित असलेल्या आधुनिक शेतीत इस्राइलची शेती अत्यंत सुधारलेली आहे. ठिबक सिंचन तंत्रज्ञान हे इस्राइलमध्ये ज्या पद्धतीने विकसीत झालं आणि त्याचा वापर ज्या वेगाने वाढलेला आहे. अशी उदाहरणे जगात क्वचितच आढळतील.

ठिबक पद्दतीच्या साहित्याचा दर्जा,टिकाऊपणा हा इस्त्रायली तंत्रज्ञानाचा एक अनोखा आविष्कार आहे. ड्रीपरचा टिकाऊपणा आणि दर्जा, लॅटरल पाईप्स, वॉल्स याबाबतीत त्यांच्या तंत्रज्ञानाला तोड नाही. हे तंत्रज्ञान टिकाऊ दर्जाचा माल आणि शेतकऱ्यांशी प्रतरणा न करणाऱ्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा विकासाचा पाया मजबूत झाला आहे.

हरितगृह हे इस्राइलमधील शेतीचं दुसरं वैशिष्टये आहे. हॉलंडपेक्षा कमी खर्चात उपलब्ध होणारी हरितगृह आणि त्यामधील संपूर्ण नियंत्रित अशा पद्धतीत यांचा वापर सर्रास आहे भविष्यात अशा पद्धतीची शेती महाराष्ट्राच्या विकासाची दिशा बदलणार आहे हे नक्की. आजही हरित गृहातील फुल आणि भाजीपाला शेती वेग घेतांना दिसत आहे.
इस्राइलमधील आज एकरी तीनशे टन टोमॅटो उत्पादन देणारी आणि त्याच प्रमाणात ढोबळी मिरचीचेही उत्पादन होते. हरितगृहे पाहिल्यानंतर कमीत कमी पाण्यात अधिकाधिक कृषी उत्पादन घेणारा देश भारताला नव्या तंत्रज्ञानाचं जणू धडेच देत आहे. आपण किमान या नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कार स्वीकारुन उन्नती करायला हवी.