महागाई वाढण्याचं खरं कारण

(जयवंत पाटील, झी २४ तास) महागाई वाढली, तूरदाळ वाढली, टॉ़मॅटो महागला, पालेभाज्या महागल्या असं सर्वत्र वाचण्यात येत आहे. न्यूज पेपर्स, न्यूज चॅनेल्स यात मागे नाहीत. पण महागाई का वाढतेय, याचं उत्तर शोधण्यास कुणीही तयार नाही.

Updated: Nov 19, 2015, 02:14 PM IST
महागाई वाढण्याचं खरं कारण title=

मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) महागाई वाढली, तूरदाळ वाढली, टॉ़मॅटो महागला, पालेभाज्या महागल्या असं सर्वत्र वाचण्यात येत आहे. न्यूज पेपर्स, न्यूज चॅनेल्स यात मागे नाहीत. पण महागाई का वाढतेय, याचं उत्तर शोधण्यास कुणीही तयार नाही.

शहरी बांधवांनी आता दीड वर्षापर्यंत तरी महागाईशी जुळवून घेतलेले बरं, कारण पाऊस न झाल्याने जमिनीत पाणीच शिल्लक राहिलेलं नाही, आज दुधाळ जनावरांना प्यायला पाणी देण्यास शेतकऱ्यांना नाकी नऊ येत आहेत, उद्या गावागावातील माणसं पिण्याचं पाणी शोधतील. ग्रामीण महाराष्ट्रात यापेक्षाही भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे.

या दरम्यान डाळीचं पिक सोडा, भाजीपाला कुठून येणार? आज अर्ध्या भारतात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. शिवार ओसाड झालंय, त्यामुळे आणखी सहा ते सात महिने ग्रामीण जनता हातावर हात धरून बसणार आहे.

शेतीत पिकणार नाही, तर महागाई तर वाढेलच ना भाऊ, शेतकरी पिकवणार नाही तर काय खाणार?, असं जेव्हा कुणी म्हटलं तर आपल्याला मनातल्या मनात वाटतं ना, काय फरक पडणारंय?. 

आता तुम्हाला काही दिवसांनी आणखी तीव्रतेने लक्षात येईल, आणि तुम्हीच म्हणाल, फरक तर पडतोच भाऊ.

तुरदाळ हे सहा महिन्याचं पिक आहे, यातही त्याचं यंदा फारसं चांगलं उत्पन्न झालेलं नाही. बीटी कापसावर अळ्यांना काहीच खाता येत नाही, त्यांच्यासाठी बीटी कापसाची पाने विषच झाली आहेत.

याचाच दुष्परीणाम की काय यावर्षी कडूनिंबावरही अळ्या पडल्या आहेत, खायला काही नाही, म्हणून अळ्यांनी कडूनिंबाचा पाला खायला सुरूवात केली आहे. अनेक ठिकाणी कडुनिंब आता बोडकी झाली आहेत, खरंतर कडुनिंबाच्या पाल्यापासून निंबोण्यांचा फवारा करून कीड निंयत्रणात आणण्याचं काम केलं जातं. अशा वातावरणात आता तूर सारख्या पिकांना अळ्यांनी माफी केलेली नाही, तुरीवरही अळीचा मोठा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे उत्पन्न विसरा.

जगाचा सरळ नियमच आहे, ज्या वस्तू कमी त्यांना मागणी अधिक असते, आणि यावर्षी अन्नधान्यापासून कापसापर्यंत सर्वच गोष्टींचा वानवा आहे, म्हणून तुम्हाला महागाईचा सामना करावाचं लागेल, सरकार कोणतंही असू द्या, सीएम, पीएम कुणी असो, महागाईचा मार सर्वांना लागणारच.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.