Crime News : एका क्षणात होत्याचं नव्हत झाल; सुखी संसाराचा दुर्दैवी अंत

रागाच्या भरात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर पती भयभीत झाला. यानंतर त्याने देखील स्वत:चे आयुष्य संवपले. 

Updated: May 12, 2023, 11:10 PM IST
Crime News :  एका क्षणात होत्याचं नव्हत झाल; सुखी संसाराचा दुर्दैवी अंत title=

Jalna Crime News : रागाच्या भरात माणूस काहीही करुन बसतो. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पती पत्नीमध्ये वाद आला आणि एका क्षणात होत्याचं नव्हत झाल. भांडणामुळे सुखी संसाराचा दुर्दैवी अंत झाला आहे. पतीने पत्नीची हत्या करुन स्वत: देखील आात्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

जालन्यात पतीने पत्नीचा खून करुन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथे ही घटना घडली आहे. 32 वर्षीय संगीता पवार असं खून झालेल्या पत्नीचं नाव असून 35 वर्षीय संजय पवार अशी मृतांची नावं आहेत.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संजय पवार याने घराचा दरवाजा आतील बाजूने बंद करून पत्नी संगीता हिला मारहाण केली. मारहाण करत असताना संजय पवार याने पत्नी संगीता हिच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले या मारहाणीत तिचा जागीच मृत्यू झाला. हाणामारीत पत्नीचा मृत्यू झाल्याचे पाहून पती भयभीत झाला. 

पत्नीचा मृतदेह तसाच घरात रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. यानंतर संजय याने शेतात जाऊन झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलाने केला वडिलांचा खून

अकोल्यातील कृषी नगर मध्ये एका मुलाने आपल्या जन्मदाता वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे. मुलाने वडिलांच्या डोक्यावर दगड मारून हत्या केली आहे. मृत व्यक्ती हा रोज दारू पिऊन पत्नीला मारहाण करत असल्याने या जाचाला कंटाळून मुलाने वडिलाचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. सिव्हिल लाईन पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

वृद्ध दाम्पत्यास जबर मारहाण करून लुटले

वाशिम शहरातील जुनी IUDP कॉलनीतील एका कुटुंबातील वृद्ध दाम्पत्यास जबर मारहाण करून लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. यांच्या अटकेनंतर इतरही सात गुन्हे उघड झाले आहेत. या दोन अट्टल चोरट्यांना ताब्यात घेऊन 8.70 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. या चोरट्याने अधिक कुठे - कुठे चोऱ्या केल्या का याचा अधिक तपास वाशिम पोलीस करीत आहेत.