अन् 'या' सुपरस्टार अभिनेत्याने पूर्ण केली १०६ वर्षांच्या आजीबाईंची इच्छा

Nov 26, 2018, 14:18 PM IST
1/6

अन् 'या' सुपरस्टार अभिनेत्याने पूर्ण केली १०६ वर्षांच्या आजीबाईंची इच्छा

आपल्या आवडत्या अभिनेत्याची भेट घेणं ही अनेकांचीच इच्छा असते. एकदा तरी रुपेरी पडद्यावर दिसणारा अमुक एका आवडत्या अभिनेत्याचा, अभिनेत्रीचा चेहरा समोरुन प्रत्यक्षात पाहायला मिळावा, त्या कलाकाराशी संवाद साधण्याची संधी मिळावी अशीच अपेक्षा, इच्छा चाहतेमंडळी आपल्या मनाशी बाळगतात. 

2/6

अन् 'या' सुपरस्टार अभिनेत्याने पूर्ण केली १०६ वर्षांच्या आजीबाईंची इच्छा

अशीच इच्छा बाळगली होती, १०६ वर्षांच्या एका आजीबाईंनी. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू या अभिनेत्याने या आजीबाईंच्या मनावर असं काही राज्य केलं आहे की दिवसभर त्या त्याचचच नाव जपत असतात. 

3/6

अन् 'या' सुपरस्टार अभिनेत्याने पूर्ण केली १०६ वर्षांच्या आजीबाईंची इच्छा

'भारत अने नेनू' या चित्रपटातील महेश बाबूची भूमिका पाहून तर त्या इतक्या प्रभावित झाल्या की, त्याला भेटणं हीच आपली शेवटची इच्छा असल्याचंही म्हटलं जात आहे. 

4/6

अन् 'या' सुपरस्टार अभिनेत्याने पूर्ण केली १०६ वर्षांच्या आजीबाईंची इच्छा

'अगर किसी चीज कोण शिद्दत से चाहो, तो पुरी कायनात तुमको उसे मिलाने की  साजिशमे लग जाती है', हा संवाद आजीबाईंसाठी अगदी शोभत आहे. कारण, आजीबाईंची हीच इच्छा सोशल मीडिया आणि माध्यमध्ये चर्चेत आली आणि थेट महेश बाबू पर्यंत पोहोचली. 

5/6

अन् 'या' सुपरस्टार अभिनेत्याने पूर्ण केली १०६ वर्षांच्या आजीबाईंची इच्छा

महेश बाबूनेही त्याच्या आगामी 'महर्षी', या चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढत होता. १०६ वर्षीय चाहतीची भेट घेतली. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पहण्याजोगा होता. 

6/6

अन् 'या' सुपरस्टार अभिनेत्याने पूर्ण केली १०६ वर्षांच्या आजीबाईंची इच्छा

वयाकडे दुर्लक्ष करत आपल्याला मिळणाऱ्या या प्रमाप्रती त्याने कृतज्ञता व्यक्त करत या अनोख्या चाहतीचे आभार मानले. या आजीबाईंना आणि इतरांनाही माझ्या अभिनयामुळे मी प्रभावित करत असून, त्या आजीबाईंहून जास्त आनंद मलाच झाला असंही तो महणाला. चाहते आणि कलाकारांमध्ये असणाऱ्या अव्यक्त तरीही घनिष्ट अशाच नात्याचा इथे प्रत्यय आला, असं म्हणायला हरकत नाही.