18 GB रॅम, 512 GB स्टोरेज, एकाच वेळी वापरता येणार 50 Apps;  OnePlus चा सर्वात पॉवरफुल मोबाईल

OnePlus मोबाईल कंपनी आजपर्यंतचा सर्वात पॉवरफुल मोबाईल लाँच करणार आहे. 18 GB रॅम, 512 GB स्टोरेज यात असणार आहे. एकाच वेळी 50 Apps वापरता येणार आहेत. OnePlus 11R असे या स्मार्टफोनचे आहे. 

Oct 03, 2023, 20:52 PM IST

OnePlus 11R Solar Red 5G : OnePlus मोबाईल कंपनी आजपर्यंतचा सर्वात पॉवरफुल मोबाईल लाँच करणार आहे. 18 GB रॅम, 512 GB स्टोरेज यात असणार आहे. एकाच वेळी 50 Apps वापरता येणार आहेत. OnePlus 11R असे या स्मार्टफोनचे आहे. 

1/7

OnePlus 11R Solar Red 5G हा  OnePlus कंपनीचा आजपर्यंतचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन असणार आहे. 

2/7

7 ऑक्टोबरला हा फोन भारतात लाँच होणार आहे. याची किंमत अद्याप जाहीर झाली नसली तरी हा लएक बजेट फोन असणार आहे. 

3/7

या फोनममध्ये 5000mAh चा दमदार बॅटरी बॅकअप असणार आहे. SUPERVOOC चार्जरमुळे हा फोन 25 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होणार आहे. 

4/7

या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर असणार आहे. यामुळे हा फोन गेमिंगसाठी सर्वोत्तम फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.   

5/7

OnePlus 11R Solar Red  या फोनमध्ये 50 MP कॅमेरा असणार आहे. 

6/7

सोलर रेड लेदर बॅक फिनिश असलेल्या या फोनमध्ये तब्बल  512 GB स्टोरेज मिळणार आहे.   

7/7

या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात LPDDR5X 18 GB रॅम असणार आहे. यामुळे एकाच वेळी 50 Apps वापरता येणार आहेत.