3200 MP लेन्स आणि 3000 किलो वजन! जगातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा

जगातील सर्वात मोठा कॅमेरा अंतराळातील अदृष्य गोष्टींचे   HD फोटो काढणार आहे. 

Apr 05, 2024, 22:38 PM IST

LSST Largest Digital Camera :  जगातील सर्वात मोठा कॅमेरा संशोधकांनी तयार केला आहे. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशन आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी यांच्या मदतीने हा कॅमेरा तयार करण्यात आला आहे. अवकाश निरीक्षणासाठी या कॅमेऱ्याची मदत होणार असल्याचे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जेल्को इवेजिक यांनी सांगितले.

 

1/7

जगातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा संशोधकांनी तयार केला आहे. 

2/7

प्रामख्याने अवकाश संशोधनासाठी या कॅमेऱ्याचा वापर केला जाणार आहे.  आकाशगंगा आणि सौरमाला यांचे निरीक्षण तसेच अंतराळातील अदृष्य गोष्टींची छायाचित्रे  या कॅमेऱ्याच्या मदतीने घेता येणार आहेत. 

3/7

 हा कॅमेरा 8980 फूट उंचीवर असलेल्या दुर्बिणीत बसवण्यात येणार आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीने 25 किलोमीटर अंतरावर गोल्फ बॉलचे देखील HD फोटो काढता येणार आहेत.   

4/7

या कॅमेऱ्याचे वजन तब्बल 3000 किलो आहे. या कॅमेऱ्याची समोरची लेन्स 1.5 मीटर म्हणजेच सुमारे 5 फूट व्यासाची आहे.  दुसरी लेन्स 3 फूट रुंद आहे. 

5/7

रुबिन वेधशाळेच्या सिमोनी सर्व्हे टेलिस्कोपमध्ये हा कॅमेरा बसवला जाणार आहे. 

6/7

चिली येथील वेरा सी. रुबिन वेधशाळेच्या दुर्बिणीत हा कॅमेरा बसवला जाणार आहे.  

7/7

 हा कॅमेरा तब्बल 3200 मेगापिक्सेलचा आहे. हा कॅमेरा तयार करण्यासाठी तब्बल 20 वर्ष लागली.