यशाची 100 टक्के खात्री, डॉ. कलाम यांचे 4 मूलमंत्र कायम लक्षात ठेवा

भारताचे 11वे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार आजही देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतात. 

Jan 26, 2024, 14:28 PM IST

A. P. J. Abdul Kalam Quotes: भारताचे 11वे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार आजही देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतात. 

1/7

A. P. J. Abdul Kalam Quotes: यशाची 100 टक्के खात्री, डॉ. कलाम यांचे 4 मूलमंत्र कायम लक्षात ठेवा

4 mantras shared by Former President of India APJ Abdul Kalam for successful living

A. P. J. Abdul Kalam Quotes: डॉ. अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाइल मॅन म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा सरळ स्वभाव, विनम्रता आणि विचार युवकांना प्रेरणादायी ठरतात.   

2/7

मंत्र

4 mantras shared by Former President of India APJ Abdul Kalam for successful living

तुम्हालाही यश मिळवण्यात अनेक अडचणी येत असतील तर डॉ. कलाम यांचे हे चार मंत्र नेहमी लक्षात ठेवा   

3/7

मोठी स्वप्ने पाहा

4 mantras shared by Former President of India APJ Abdul Kalam for successful living

मोठी स्वप्ने पाहणे ही यशाची पहिली पायरी आहे. ही स्वप्नेच आपल्याला प्रेरणा देतात आणि आपले लक्ष्य पूर्ण करण्याची क्षमता निर्माण करतात. 

4/7

नेहमी ज्ञान प्राप्त करत राहा

4 mantras shared by Former President of India APJ Abdul Kalam for successful living

कोणताही उद्देश प्राप्त करण्यासाठी ज्ञान मिळवणे खूप गरजेचे आहे. शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही. आयुष्यभर शिकत राहिले पाहिजे. ज्ञान आपल्याला जग समजण्यासाठी व तुमच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी व तुमचे उद्दिष्ट्य प्राप्त करण्यास सक्षम बनवतो. ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तके वाचा. नवीन कोर्स करा किंवा अनुभवी लोकांकडून शिकण्याचा प्रयत्न करा. 

5/7

कठोर मेहनत

4 mantras shared by Former President of India APJ Abdul Kalam for successful living

यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत करणे गरजेचे आहे. डॉ. कलाम यांचे म्हणणे आहे की, कठोर मेहनत केल्यास कोणतेही आव्हान सहज पूर्ण होते. स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी समर्पण, धैर्य आणि कठोर मेहनतीने काम करणे गरजेचे आहे. रस्त्यात येणारे अडथळ्यांतून हार मानू नका आणि आपलं लक्ष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. 

6/7

हार मानू नका

4 mantras shared by Former President of India APJ Abdul Kalam for successful living

जीवनात अयशस्वी होणे आणि परीक्षा हे कधीच कोणाला चुकत नाही. कलाम यांचे मानणे हे की, अपयश ही नेहमीच आपल्यात उत्साह जागृत करते. आपल्याला शिकण्याची एक संधी देते. अपयशामुळं खचून जावू नका. अपयश नेहमीच आपल्याला मजबूत बनवते. आपल्याला मोठ्या मनाने हार स्वीकार करण्याची गरज आहे. मात्र, हार मानू नका, सतत प्रयत्न आणि दृढ संकल्प यामुळं आपण कोणताही अडथळा पार करु शकतात.  

7/7

भारतरत्न

4 mantras shared by Former President of India APJ Abdul Kalam for successful living

भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केल्याबद्दल डॉ. कलाम यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण व्यतिरिक्त भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेले भारतरत्न देखील प्रदान करण्यात आला.