Hot Drink For Winter : जास्त थंडी जाणवते? मग हे पाच पेये शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत करतील

अनेक लोक असे असतात ज्यांना जास्त प्रमाणात थंडी जाणवते. तुम्ही सुद्धा यांच्यापैकी एक असाल तर शरीब उबदार ठेवण्यासाठी तुम्ही हे काही उपाय करु शकता.

Jan 05, 2023, 15:48 PM IST

Hot Drinks For Winter: तापमानाचा पारा थोडासा जरी खाली आला तरी लगेच थंडी जाणवायला लागते. अशावेळी लोक स्वत: ला उबदार ठेवण्यासाठी विविध गोष्टी करतात. तर दुसरीकडे बहुतेक लोक हिवाळ्यात चहा आणि कॉफी पितात. परंतु याशिवाय काही पेये आहेत जे शरीराला उष्णता देतात. हे पेय पिण्यासाठी तुम्हाला जास्त पैसेही खर्च करावे लागत नाहीत. कारण तुम्ही हे पेय घरच्या घरी तयार करू शकता. चला जाणून घ्या हिवाळ्यात उबदारपणा देणाऱ्या या पाच पेयांबद्दल...

1/5

Hot Drink For Winter : जास्त थंडी जाणवते? मग हे पाच पेये शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत करतील

हिवाळ्यात तुम्ही हर्बल चहा पिऊ शकता. हर्बल चहा प्यायल्याने शरीराला ऊब मिळते तसेच शरीरालाही आतून उबदार ठेवते. हिवाळ्यात तुम्ही ग्रीन टी, तुळशीचा चहा आणि आल्याचा चहा पिऊ शकता.  

2/5

Hot Drink For Winter : जास्त थंडी जाणवते? मग हे पाच पेये शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत करतील

दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हिवाळ्यात शरीर आतून उबदार ठेवायचे असेल तर दालचिनी पाण्यात उकळून प्या. याचा तुम्हाला फायदा होईल.  

3/5

Hot Drink For Winter : जास्त थंडी जाणवते? मग हे पाच पेये शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत करतील

हिवाळ्यात हळदीचे दूध पिणेही उत्तम असते. हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ते शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करतात.   

4/5

Hot Drink For Winter : जास्त थंडी जाणवते? मग हे पाच पेये शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत करतील

लिंबू घालून गरम पाणी प्यायल्यास शरीर उबदार राहते. गरम लिंबू पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्तीही वाढेल.  

5/5

Hot Drink For Winter : जास्त थंडी जाणवते? मग हे पाच पेये शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत करतील

हिवाळ्यात बदामाचे दूध पिणेही फायदेशीर असते. बदामाचा प्रभाव उष्ण असतो. हे तुमचे शरीर गरम करेल. बदाम बारीक करून त्यात दूध घालून प्या. त्यामुळे जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरताही पूर्ण होईल.