आहारातील हे 7 पदार्थ ठेवा दूर , हृदयातील रक्त शोषून घेण्यासोबतच वाढवतात घाणेरडा कोलेस्ट्रॉल

Bad Foods For Heart Health: आहारातील असे काही पदार्थ आहे जे तुमच्या शरीरासाठी घातक आहेत. या पदार्थांमुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राखणे अतिशय महत्त्वाचे आहे. अशावेळी कोणते पदार्थ आपल्यासाठी घातक आहेत, ते समजून घ्या.

| Mar 20, 2024, 11:50 AM IST

आपण दिवसभर जे काही खातो त्यात काही पदार्थ घाणेरडे असतात. हे खाल्ल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ वाढतात आणि नंतर शरीराच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. या अस्वास्थ्यकर पदार्थांमध्ये जास्त चरबीयुक्त पदार्थांचाही समावेश होतो. हे शिरांमध्ये कोलेस्टेरॉल वाढवतात. नसा ब्लॉक झाल्यामुळे हृदयाला रक्त मिळत नाही. हे हृदयविकाराचे कारण बनू शकतात, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

1/7

बटर

7 Worst Food

तुम्हाला बटर खायला आवडत असेल तर आताच सावध व्हा. बटर टोस्ट, बटर नूडल्स, बन मस्का इत्यादी खाल्ल्याने लो डेन्सिटी लिपोप्रोटीन वाढू शकते. USDA नुसार, एक चमचे लोणीमध्ये 91.3 mg सोडियम आणि 30.5 mg कोलेस्ट्रॉल असते. यामुळे हृदयाला धोका निर्माण होतो. अशावेळी तुम्ही हे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. 

2/7

चिप्स

7 Worst Food

चिप्स, वेफर्स हे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे पदार्थ आवडतात. भूक लागल्यावर किंवा अगदी कंटाळा आल्यावरही हे पदार्थ खाल्ले जातात. पण शरीरासाठी हे पॅकेज फूड अतिशय घातक आहे. हानिकारक असलेल्या या पदार्थांना लांबच ठेवा. 

3/7

आइस्क्रिम

7 Worst Food

उन्हाळा आला की आईस्क्रीमच्या विक्रीत मोठी वाढ होते. थंडीची अनुभूती देणारा हा पदार्थ घाणेरड्या चरबीने भरलेले असते आणि भरपूर कॅलरीज देते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. तसेच या पदार्थामुळे इतर संसर्गजन्य आजारही होतात. 

4/7

फ्रेंच फ्राइस

7 Worst Food

बटाट्याच्या चिप्सप्रमाणे फ्रेंच फ्राईज देखील हृदयाला हानिकारक असतात. हे पदार्थ तळण्यासाठी तेलाचा वापर केला जातो. हे हृदयासाठी खूप हानिकारक आहे आणि शरीरावर चरबी वाढवते. तसेच सतत सतत एकच तेल वापरल्यामुळे शरीरासाठी घातक असते.

5/7

समोसा

7 Worst Food

बटाट्याच्या सारणासह समोसा आरोग्यासाठी हानिकारक आहे. कधी-कधी याचे सेवन केल्याने फारसा फरक पडत नाही, पण जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. कारण बटाटा आणि तेलकटपणा असे हे दोन्हीपद्धतीने शरीरासाठी घातक आहे. 

6/7

पिझ्झा

7 Worst Food

हे फास्ट फूड रिफाइंड मैदा, चरबी आणि हानिकारक रसायनांनी भरलेले आहे. यामुळे नसा कमकुवत होतात आणि रक्ताभिसरणात व्यत्यय येतो. हे पदार्थ लठ्ठपणाचे प्रमुख कारण मानले जाते.

7/7

बर्गर

7 Worst Food

हे एक जंक फूड आहे ज्यामध्ये मायोनिझ, क्रीम, तळलेल्या टिक्की इत्यादी गोष्टी जोडल्या जातात. यामध्ये समाविष्ट असलेले प्रत्येक घटक हृदयासाठी धोकादायक ठरतात. या पदार्थांचे सेवन शरीरासाठी घातक आहेत.