500 वर्षांनंतर 'या' ठिकाणी सर्वांची आडनावं असणार सारखी; कारण ऐकून व्हाल हैराण!

आपल्या देशात विविध जाती तसंच धर्माचे लोक राहतात. त्यामुळे प्रत्येकाच्या आडनावांमध्ये भिन्नता आहे. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की असा एक देश आहे जिथे पुढील 500 वर्षांत सर्व लोकांची आडनावे सारखीच असणार आहे.

| Apr 10, 2024, 11:47 AM IST
1/7

तुम्हाला अशा देशाबद्दल माहिती आहे का, जिथे येत्या 500 वर्षात राहणाऱ्या सर्व नागरिकांची आडनावे सारखीच असतील? 

2/7

एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. हा देश दुसरा तिसरा कोणता नसून जपान आहे. 

3/7

जपानमधील एका संशोधनात असा दावा केला जात आहे की, 500 वर्षांनंतर म्हणजेच 2531 मध्ये सर्व जपानी लोकांचे आडनाव एकच असणार आहे.

4/7

जपानच्या तोहोकू विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर हिरोशी योशिदा यांच्या गणनेनुसार, येत्या काळात जपानमधील सर्व लोकांचे आडनाव सैटो असणार आहे.

5/7

2023 मध्ये, जपानच्या लोकसंख्येच्या 1.529 टक्के लोकांचं आडनाव हे सैटो असणार आहे. हे देशातील सर्वात सामान्य आडनाव आहे.  

6/7

अहवालानुसार, जपानमधील सैटो आडनावाचा वार्षिक वाढीचा दर 1.0083 टक्के आहे. अशा स्थितीत सन 2446 पर्यंत निम्म्या लोकसंख्येचे आडनाव सैटो असण्याची शक्यता आहे.

7/7

यामागील कारण म्हणजे जपानी कायद्यांतर्गत सर्व विवाहित जोडप्यांना एकच आडनाव ठेवावं लागतं. मात्र या गोष्टीला जपानमधील अनेकांचा विरोध आहे.