बॉलिवूडचे शहेनशाह Amitabh Bachchan अंधश्रद्धाळू? बिग बीचं आश्चर्यकारक उत्तर

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या विषयी जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. बिग बी अंधश्रद्धाळू आहे की नाही यांचं उत्तर खुद्द शहेनशाहने दिलं आहे. 

Aug 26, 2023, 15:14 PM IST

Amitabh Bachchan : बॉलीवूड सुपर स्टार आणि शहेनशाह बिग बी यांचे लाखो चाहते आहेत. आजही चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वांचं मनं जिंकते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्यांच्या स्वभवातील गोष्टींबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. (amitabh bachchan revealed he is not superstitious and kitchen kisse)

1/8

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. अनेक गोष्टी चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

2/8

त्यांचा खाजगी वाहिनीवर टीव्ही शो सध्या धुमाकूळ घालत आहे. या शोमधून अमिताभ बच्चन खुद्द त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर करत असतात.   

3/8

या शोमध्ये एका महिलेने अमिताभ बच्चन यांना विचारलं की, तुम्ही किचनमध्ये नाही जात ना? त्यावर बिग बी म्हणाले तुम्हाला कसं माहिती की मी किचनमध्ये जातो की नाही. 

4/8

त्यानंतर महिलेने विचारलं की,  तुमच्या किचनमध्ये गॅस आहे का? यावर उपस्थित प्रेक्षक हसायला लागले. यावर बिग बी म्हणाले की तुमचा मोठा गैरसमज आहे. माझा बेडसुद्धा किचनमध्ये आहे. हे ऐकून सर्व जण हसायला लागले. 

5/8

अमिताभ बच्चन यांच्या या प्रसिद्ध शोमध्ये स्पर्धक त्यांना असे असे प्रश्न विचारतात की, बिग बी हैराण होऊन जातात. 

6/8

एका स्पर्धकाशी अंधश्रद्धेवर चर्चा सुरु असताना बिग बीला तो स्पर्धक सांगतो की, तो घरातून बाहेर पडताना त्या एका व्यक्तीचा चेहरा पाहत नाही. जर ती व्यक्ती त्याला भेटली तर रस्ता बदलतो.   

7/8

 त्यावर त्या स्पर्धकाने थेट अमिताभ बच्चन यांना विचारलं तुमचा अंधश्रद्धेवर विश्वास आहे का? त्यावर बिग बीने अगदी मजेशीर उत्तर दिलं.   

8/8

मी नाही मानत पण माझा ड्रायव्हरचा यावर विश्वास आहे, जर काळी मांजरीने रस्ता ओलांडला तर तो विनाकरण गाडी फिरवतो. हे उत्तर देताना बिग बि लोकांनाही असंही सांगतात की अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका लोकांचं आयुष्य त्यामुळे खराब होतं.