ARG vs FRA Final: फायनल सामन्यात उतरतच लिओनेल मेस्सीने रचला इतिहास

2014 सालच्या फिफा वर्ल्डकपमध्ये लिओनेल मेस्सीची टीम अंतिम फेरीत पोहोचला होती. मात्र त्यांना वर्ल्डकप जिंकता आला नव्हता. मात्र यावेळी मेस्सीला ही पोकळी देखील भरून काढायची आहे. 

Dec 18, 2022, 22:23 PM IST
1/5

कतारच्या लुसेल स्टेडियममध्ये फिफा वर्ल्डकप 2022 चा अंतिम सामन्याचं आयोजन केलंय. या फायनल सामन्यात गतविजेती फ्रान्सच्या टीमसमोर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आहे. मेस्सीला पहिला वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करायचंय. दरम्यान या सामन्यासह मेस्सीने एक विक्रम आपल्या नावावर केलाय.

2/5

मेस्सी फायनलच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या स्टार्टिंग इलेव्हनचा भाग आहे. यासह तो वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक 26 सामने खेळणारा खेळाडू बनलाय. या बाबतीत मेस्सीने वर्ल्डकपमध्ये 25 सामने खेळणाऱ्या जर्मनीच्या लोथा मॅथ्यूसला मागे टाकलंय.

3/5

यामध्ये तिसऱ्या नंबरवर जर्मनीचा मिरोस्लाव क्लोज आहे, त्याने फिफा वर्ल्डकपमध्ये जर्मनीसाठी 24 सामने खेळलेत, तर इटलीचा मालडिनीने 23 सामने खेळलेत.

4/5

तर मेस्सीच्या देशाचा डिएगो मॅरोडोना आणि जर्मनीचा उवा झिला यांने 21-21 सामने खेळले आहेत.

5/5

अर्जेंटीनाने त्यांचा शेवटचा वर्ल्डकप 1986 मध्ये खेळला होता. तर यापूर्वी 1978 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता.